स्मॉल सेव्हिंग स्कीम्समध्ये गुंतवणूक कारताय? मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 30, 2020 03:03 PM2020-09-30T15:03:29+5:302020-09-30T15:25:31+5:30

छोट्या बचतीसाठी स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्स (छोट्या बचत योजना) अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. या स्कीम्स सुरक्षित तर असतातच, पण यांत परतावाही चांगले मिळतो.

आपणही स्मॉल सेव्हिंग्स स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल, तर आपल्यासाठी लवकरच आनंदाची बातमी येऊ शकते.

आगामी तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी, पीपीएफ, एनएससी, सुकन्या सारख्या स्‍मॉल सेव्हिंग स्‍किमच्या व्याजदरांसंदर्भात निर्णय होणार आहे.

स्‍मॉल सेव्हिंग स्‍कीमच्या व्याजदरांत यावेळी वाढ होण्याची शक्यता आहे. या योजनांच्या व्याजदरात वाढ झाल्यास मिळणाऱ्या परताव्यातही वाढ होईल. परिणामी या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होईल.

यापूर्वी जुलै ते सप्टेंबरपर्यंतच्या तिमाहीत व्याजदरात बदल करण्यात आला नव्हता. यामुळे आता आगामी तिमाहीत व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशा स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याजदरासंदर्भात सरकारकडून दर तीन महिन्याला आढावा घेण्यात येतो. यानुसार व्याजदरात वाढ अथवा कपात करण्याचा निर्णय घेतला जातो.

या स्कीम्सचा व्याजदर वाढल्यास गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला फायदा होतो. तर व्याजदरात कपात झाल्यास गुंतवणूकदारांना कमी परतावा मिळतो.

सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजनांमध्ये 7.4 टक्के तर सुकन्या समृद्धी योजनेसाठी 7.6 टक्के व्याजदर आहे.

सुकन्या समृद्धि योजना मुलींच्या भविष्यातील आर्थिक तरतूदीच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे.

छोट्या बचतीसाठी स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्स मानल्या जातात फायदेशीर.

Read in English