शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणूकदारांवर आलीय डोक्याला हात लावायची वेळ! ₹2700 वरून ₹11 वर आला शेअर, 14 तारखेला मोठी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 9:08 PM

1 / 7
शेअर बाजारात सोमवारच्या व्यवहारादरम्यान अनिल अंबानींची दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटलचा शेअर फोकसमध्ये होते. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. रिलायन्स कॅपिटलचा शेअर आज 5% ने घसरून 11.78 रुपयांवर आला आहे.
2 / 7
माध्यमांतील वृत्तानुसार, रिलायन्स कॅपिटलच्या प्रशासकाने रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या बोर्डाला पत्र लिहून कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांना ₹118 कोटी भरण्याच्या तरतुदीवर आक्षेप नोंदवला आहे. ही तरतूद रिलायन्स जनरल इन्शुरन्सने केली आहे. तर दुसरीकडे, कंपनीने शेअर बाजाराला आपल्या आगामी बैठकीसंदर्भात माहिती दिली आहे.
3 / 7
14 फेब्रुवारीला संचालक मंडळाची बैठक - कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2024 रोजी होईल, असे रिलायन्स कॅपिटल लिमिटेडने बीएसईला कळवले आहे. यापूर्वी ही बैठक 10 फेब्रुवारीला होणार होती. या बैठकीत इतर गोष्टींसोबतच कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकालही जाहीर केले जातील. यात चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांचे निकालही असतील.
4 / 7
अशी आहे शेअरची स्थिती - या शेअरची किंमत 2008 मध्ये 2700 रुपयांवर होती. आज 12 फेब्रुवारी 2024 रोजी हा शेअर 11.78 रुपयांवर आहे. अर्थात हा शेअर आतापर्यंत तब्बल 99% ने घसरला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 15.16 रुपये, त नीचांक 7.60 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 297.69 कोटी रुपये एवढे आहे.
5 / 7
कंपनीत अनिल अंबानींचा वाटा किती - महत्वाचे म्हणजे, रिलायन्स कॅपिटलमध्ये प्रमोटर्सकडे 0.88% एवढीच हिस्सेदारी आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग 98.49% एवढी आहे. इंडिव्हिज्युअल प्रमोटर्समध्ये अनिल अंबानी फॅमिलीकडे 2,91,961 शेअर आहेत. मात्र, यातही अनिल अंबानी यांचा वाटा आता शून्य आहे.
6 / 7
अनिल यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्याकडे कंपनीचे 2,63,474 शेअर आहेत. तर, मुलं जय, अनमोल अंबानी यांच्याकडे 28,487 शेअर आहेत. रिलायन्स कॅपिटलच्या प्रमोटर ग्रुपसंदर्भात बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे 19,34,405 शेअर आहेत.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकRelianceरिलायन्स