शेअर असावा तर असा, 15 दिवसांत दुप्पट केला पैसा; एका वर्षात 5 पट परतावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 05:08 PM2024-02-06T17:08:50+5:302024-02-06T17:17:03+5:30

9 रुपयांवरून 62 रुपयांच्याही वर...

एका स्मॉल कॅप स्टॉकने केवळ 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट केला आहेत. महत्वाचे म्हणजे शेअर बाजारात चढ-उताराची परिस्थिती असताना या शेअरने ही कमाल केली आहे.

आम्ही बोलत आहोत, IFCI Ltd च्या शेअर संदर्भात. सोमवारी IFCI चा शेअर 3.73 टक्क्यांच्या वाढीसह 62.55 रुपयांवर बंद झाला. आज हा शेअर अपर सर्किटसह 65.40 रुपयांवर पोहोचला.

आयएफसीआय लिमिटेडचा शेअर 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह आता 65.40 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या 5 दिवसांत या शेअरमध्ये 10 टक्यांची तेजी दिसून आली आहे.

एका महिन्यात या शेअरने 116 आणि 6 महिन्यात 348 टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. तर गेल्या एका वर्षात या शेअरने 438 टक्क्यांची तेजी नोंदवली आहे.

यापूर्वी, आयएफसीआयच्या शेअरने केवळ सहा महिन्यांतच 332 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला आहे. हा शेअर 7 ऑगस्त 2023 रोजी केवळ 14.45 रुपयांवर होता. तेव्हा ज्यांनी कुणी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, त्याचे आता 4 लाख 32 हजारहून अधिक झाले असतील.

जर या शेअरच्या 2024 मधील आतापर्यंतच्या कामगिरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, या शेअरने जवळपास 116 टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे.

9 रुपयांवरून 62 रुपयांच्याही वर : गेल्या एकवर्षापूर्वी ज्याने कुणी या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल आणि ती आजपर्यंत कायम ठेवली असेल, ते आता मालामाल झाले असतील. कारण या शेअरने गेल्या केवळ एका वर्षात तब्बल 419 टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. या शेअरमध्ये वर्षभरापूर्वी ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याच्याकडे आता 5.19 लाख रुपये जमा झाले असतील.

IFCI चा 52 आठवड्यांचा उच्चांक 62.10 रुपये आहे. या शेअरने 1 फेब्रुवारी 2024 रोजी या पातळीला स्पर्श केला. तर 28 मार्च 2023 रोजी हा शेअर 9 रुपयांवर होता, जो या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. अर्थात 28 मार्च रोजी ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली त्यांच्या पैशात आता जवळपास 7 पट वाढ झाली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)