शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Baba Ramdev: बाजारात मोठी घसरण, पण रॉकेट स्पीडनं पळतोय बाबा रामदेवांच्या कंपनीचा शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 8:15 PM

1 / 9
शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला मंगळवारी ब्रेक लागला. याच बरोबर आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले.
2 / 9
ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेंसेक्‍स 709.17 प्‍वाइंट्सनी घसरून 55,776.85 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 208.30 अंकांची घसरण होऊन 16,663 अंकांवर बंद झाला.
3 / 9
एकदिवस आधीच दिसून आले अपर सर्क‍िट - बाजारात मोठी घसरण झाली असतानाही बाबा रामदेवांची कंपनी रुच‍ी सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Ruchi Soya Share Price) शेअर जबरदस्‍त तेजीसह बंद झाला. सोमवारच्या व्यवहार सत्रातही या शेअरमध्ये अपर सर्किट दिसून आले.
4 / 9
महत्वाचे म्हणजे, बाबा रामदेवांच्या या कंपनीच्या शेअरने सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारावेळीच 15 टक्क्यांनी वाढला होता.
5 / 9
24 मार्चला ओपन होणार FPO - रुची सोयने (Ruchi Soya) जवळपास 4,300 कोटी रुपयांच्या FPO साठी रेड-हेरिंग प्रॉस्पेक्टसला मंजुरी दिली आहे. कंपनीने म्हटल्या प्रमाणे, 24 मार्चला हा FPO ओपन होईल आणि 28 मार्च 2022 रोजी बंद होईल. या संदर्भातील बातमीनंतर रुची सोयाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
6 / 9
2 दिवसांत जबरदस्त फायदा - रुची सोयाचा शेयर (Ruchi Soya stock price) मंगळवारी 123.25 अंकांच्या तेजीसह 1,087 रुपयांवर पोहोचला. व्यवहाराच्या सत्रादरम्यान हा शेअर एकवेळ 1,144.70 रुपयांपर्यंतही गेला होता.
7 / 9
यापूर्वी, शुक्रवारी हा शेअर 803.15 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात केवळ दोनच दिवसांत या शेअरने 803 रुपयांवरून 1,087 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. म्हणजेच, केवळ दोनच दिवसांत या शेअरमध्ये जवळपास 35 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
8 / 9
याशिवाय, निफ्टीच्या टाटा कंझ्यूमर, मह‍िंद्रा अँड मह‍िंद्राचा शेअर, श्री सीमेंटचा शेअर, सिपलाचा शेअर आणि मारुती सुझुकीचा शेअर आदींनीही गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार