शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अनिल अंबानी यांच्या पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, 2275% नं किंमत वाढली; करतोय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:35 IST

1 / 8
शेअर बाजारातील अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी असलेल्या रिलायंस पॉवरच्या शेअरमध्ये तुफान तेजी दिसत आहे. पॉवर कंपनीचा शेअर मंगळवारी BSE वर 6 टक्क्यांहून अधिकने वधारून 42.60 रुपयांवर पोहोचला.
2 / 8
कंपनीचे मार्केट कॅप 17,000 कोटींच्याही वर पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 2275 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. स्टँडअलोन बेसिसवर कंपनी गेल्या वर्षातच कर्जमुक्त झाली आहे.
3 / 8
पाच वर्षांत 1 लाखाचे केले 23 लाख - अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरचा शेअर १७ एप्रिल २०२० रोजी १.७९ रुपयांवर होते. जो १५ एप्रिल २०२५ रोजी ४२.६० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २२७५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
4 / 8
जर एखाद्या व्यक्तीने १७ एप्रिल २०२० रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य २३.७९ लाख रुपये झाले असते.
5 / 8
दोन वर्षात 235% ची तेजी - गेल्या दोन वर्षांचा विचार करता, रिलायन्स पॉवरचा शेअर २३५ टक्क्यांनी वधारला आहे. १३ एप्रिल २०२३ रोजी पॉवर कंपनीचा शेअर १२.७९ रुपयांवर होते. जो १५ एप्रिल २०२५ रोजी ४२.६० रुपयांवर पोहोचला.
6 / 8
गेल्या एका वर्षाचा विचार करता, कंपनीचा शेअर ६३ टक्क्यांहून अधिक वधारला. या काळात कंपनीचा शेअर २६ रुपयांवरून ४२ रुपयांपर्यंत वधारला. गेल्या एका महिन्यात कंपनीचा शेअरमध्ये जवळपास २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
7 / 8
रिलायन्स पॉवरच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५४.२५ रुपये, तर ५२ आठवड्यांचा नीचांक २३.२६ रुपये आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्सshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक