अदानी समूहाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल; 10 महिन्यांत दिला 300% चा बंपर परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 22:08 IST
1 / 7हिंडेनबर्गच्या झटक्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अदानी पॉवर हा सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर ठरला आहे. गेल्या 10 महिन्यांत अदानी पॉवरचा शेअर 300% पेक्षाही अधिक वधारला आहे. 2 / 7या काळात कंपनीचा शेअर 132 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अदानी पॉवरच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 589.30 रुपये एवढा आहे. तर, नीचांक 132.55 रुपये एवढा आहे.3 / 7कंपनीच्या शेअरनं घेतली 300% हून अधिकची उसळी- अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 10 महिन्यांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 28 फेब्रुवारी 2023 रोजी 132.55 रुपयांवर होते. ते 7 डिसेंबर 2023 रोजी 562.05 रुपयांवर बंद झाला. या काळात अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये 305 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.4 / 7जर एखाद्या व्यक्तीने 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य 4.24 लाख रुपये झाले असते.5 / 75 महिन्यांत 135% हून अधिकची तेजी - अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 5 महिन्यांत 135% हून अधिकची वाढ झाली आहे. 13 जुलै 2023 रोजी अदानी पॉवरचा शेअर 237.35 रुपयांवर होते. तो 7 डिसेंबर 2023 रोजी 562.05 रुपयांवर बंद झाला. गेल्या 6 महिन्यांत अदानी पॉवरच्या शेअरमध्ये जवळपास 102% वाढ झाली आहे.6 / 7तसेच, गेल्या एका महिन्याचा विचार करता, अदानी पॉवरचा शेअर 43 टक्क्यांनी वधारले आहेत. अदानी पॉवरचा शेअर 8 नोव्हेंबर 2023 रोजी 393.85 रुपयांवर होते. जे आता 562.05 रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी पॉवरचे मार्केट कॅपही 216779 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)