शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 17:35 IST

1 / 7
प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असलेल्या यूपीआय अॅप्समध्ये सोन्यामध्ये गुंतवणुकीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रत्यक्षात सोने खरेदी करून जवळ ठेवण्यापेक्षा डिजिटल सोने खरेदीकडे लोक वळत आहेत. पण, डिजिटल गोल्ड खरेदी करणे सुरक्षित आहे का? याबद्दलच आता सेबीने सावध केले आहे. (SEBI warns investors about unregulated digital gold products)
2 / 7
ऑनलाईन तुम्ही अगदी दहा रुपयांचंही सोनं खरेदी करू शकता, तेही २४ कॅरेट. त्यामुळेच आता लोक महिन्याला किंवा जसे पैसे येतील तशा पद्धतीने डिजिटल गोल्ड खरेदी करत आहेत. पण हे तुम्हाला महागात पडू शकते.
3 / 7
डिजिटल गोल्ड खरेदी करणाऱ्यांना 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. गेल्या काही काळापासून डिजिटल गोल्ड खरेदी वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर सेबीने गुंतवणूकदारांना सावध केले आहे.
4 / 7
सेबीने म्हटले आहे की, 'काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म गुंतवणुकदारांना डिजिटल गोल्ड प्रोडक्टस् सादर करत आहे. डिजिटल गोल्डचे प्रॉडक्ट सेबीच्या नियंत्रणाखाली नाहीये. डिजिटल गोल्ड हे ना सिक्युरिटीज म्हणून अधिसूचित केले गेले आहे, ना कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणून नियमन केले गेले आहे.'
5 / 7
बिझनेस टुडेने सेबीच्या या इशाऱ्याबद्दल एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भांडवली बाजार नियंत्रक संस्थेने या बाबीवर जोर दिला आहे की, डिजिटल गोल्ड खरेदी करणारे गुंतवणूकदार सेबी नियंत्रित बाजारासाठी असलेल्या कोणत्याही सुरक्षेत येणार नाही.
6 / 7
याचा अर्थ असा की जर कोणताही व्यक्ती डिजिटल गोल्ड खरेदी करत असेल आणि त्याच्यासोबत फसवणूक झाली. डिजिटली गोल्ड विकणारी कंपनी दिवाळखोरीत निघाली, तर गुंतवणुकदारांचे पैसे अडकतील आणि त्यांना सेबीकडे कोणतीही मदत मागता येणार नाही.
7 / 7
गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल गोल्ड हा पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाला असून, त्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे. यात तरुण गुंतवणुकदारांची संख्या जास्त आहे. कारण अगदी शंभर रुपये, पाचशे रुपयात डिजिटल गोल्ड खरेदी करता येते. महत्त्वाचं म्हणजे डिजिटल गोल्ड जवळ बाळगावं लागतं नाही आणि त्यामुळे लोक याकडे जास्त आकर्षित होत आहेत.
टॅग्स :GoldसोनंSEBIसेबीInvestmentगुंतवणूक