मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळेल 20000 रुपयांपर्यंत कॅश; काय आहे 'ही' खास सुविधा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 16:07 IST
1 / 10देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India Customer) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहेत. अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. बँकेच्या वतीने ग्राहकांना विविध प्रकारच्या खास सुविधा या दिल्या जातात. 2 / 10बँकेच्या या सुविधेमुळे ग्राहकांना खूप फायदा होता. कोरोना संकटात देखील बँकेने ग्राहकांसाठी डोरस्टेप बँकिंग सुविधाही (SBI Doorstep Banking) सुरू केली आहे. यामध्ये पैसे काढण्यापासून ते पे ऑर्डरपर्यंत, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक रिक्विझेशन स्लिप तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत.3 / 10स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डोरस्टेप या सेवेमधून पैसे काढण्याची किमान मर्यादा ही 1000 रुपये आहे आणि कमाल मर्यादा 20,000 रुपये आहे. रोख रक्कम काढण्याच्या विनंतीपूर्वी बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक असणं अनिवार्य आहे. अन्यथा तुमचं ट्रान्झॅक्शन रद्द होऊ शकतं.4 / 10या बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी नोंदणी करावी लागेल. तुम्ही https://bank.sbi/dsb या अधिकृत लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.5 / 10ही सुविधा जॉइंट अकाऊंट, मायनर अकाऊंट तसंच नॉन पर्सनल अकऊंट असलेल्या लोकांना दिली जाणार नाही. दरम्यान ज्या ग्राहकांचा नोंदणीकृत पत्ता होम ब्रांचच्या 5 किमीच्या रेडियसमध्ये आहे, त्यांना ही सुविधा दिली जाणार नाही. 6 / 10डोरस्टेप बँकिंगमध्ये फायनेंशियल आणि नॉन फायनेंशियल सर्व्हिससाठी 75 रुपये आणि जीएसटी चार्ज लागणार आहे. 7 / 10बँकेच्या मोबाईल अॅप्लिकेशन, वेबसाईट किंवा कॉल सेंटर द्वारे डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी नोंदणी करता येते. याशिवाय 1800111103 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत कॉल करता येईल.8 / 10एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb ला भेट देऊ शकतात. ग्राहक बँकेच्या गृह शाखेशी देखील संपर्क साधू शकतात.9 / 10यासाठी नोंदणी होम ब्रँचमध्ये करावी लागेल. जोपर्यंत ही सुविधा संपर्क केंद्रावर पूर्ण होत नाही, तोपर्यंत होम ब्रँचमध्येच अर्ज करावा लागेल. पैसे जमा करणे आणि काढणे या दोन्हीसाठी कमाल मर्यादा 20 हजार रुपये प्रतिदिन आहे.10 / 10सर्व गैरआर्थिक व्यवहारासाठी सेवा शुल्क 60 + जीएसटी आहे तर आर्थिक व्यवहारासाठी ते 100 + जीएसटी आहे. पैसे काढण्यासाठी, चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मसह, पासबुक देखील आवश्यक असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.