शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेपर्यंत Aadhaar, PAN लिंक होणं आवश्यक; 'असं' करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 8:45 AM

1 / 11
आधार व पॅन ही दोन्ही कार्डे आता प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे घटक ठरू लागले आहेत. अनेकदा आर्थिक व्यवहारांसाठी या दोन्हीपैकी एका कार्डाची अनिवार्यता असते.
2 / 11
प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्यासाठी तर पॅन क्रमांक असणे सक्तीचे करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आधार आणि पॅन ही दोन्ही कार्डे परस्परांना संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली.
3 / 11
दरम्यान, देशातील प्रमुख बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी एक नोटीस जारी केली आहे. ग्राहकांना पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत पॅन आधार लिंक करणं अनिवार्य असणार आहे.
4 / 11
जर ग्राहकांनी पॅन आधार लिंक केलं नाही तर त्यांना बँकिंग सेवांचा वापर करताना समस्यांचा सामना करावा लागेल. यापूर्वी सरकारनं पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.
5 / 11
स्टेट बँकेनं आपल्या अधिकृत @TheOfficialSBI ट्विटर खात्यावरून ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. कोणत्याही समस्यांशिवाय जर बँकिंग सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर पॅन आधार लिंक करा असा सल्ला आम्ही देत आहोत, असं स्टेट बँकेनं म्हटलं आहे.
6 / 11
जर असं केलं नाही तर पॅन कार्ड इनअॅक्टिव्ह मानलं जाईल आणि काही विशेष ट्रान्झॅक्शनमध्ये याचा वापर करता येणार नाही, असंही बंकेनं म्हटलं आहे.
7 / 11
यापूर्वी पॅन आधार लिंक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२१ ही होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलण्यात आली आणि ३० जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा याला मुदतवाढ देण्यात आली आणि ती ३१ सप्टेंबर करण्यात आली.
8 / 11
जर तुम्ही आधार पॅन लिंक केलं आहे का नाही हे तुमच्या लक्षात नसेल तर ते तपासण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला uidai.gov.in या आधारच्या वेबसाईटवर जावं लागेल.
9 / 11
त्यानंतर तुम्हाला My Aadhaar टॅब वर जाऊन 'Check Aadhaar/Bank Account Linking Status' यावर क्लिक करावं लागेल.
10 / 11
त्या ठिकाणी तुमचा १२ डिजिटचा आधार क्रमांक टाका. त्यानंतर सिक्युरिटी कोड टाकून 'Send OTP' या ऑप्शनवर क्लिक करा.
11 / 11
त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आधार लिंकचं स्टेटस समजून जाईल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPan Cardपॅन कार्डState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाIndiaभारत