या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, एकूण संपत्ती पाहून विस्फारतील डोळे, टॉप १० मध्ये कोण कोण पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 17:21 IST
1 / 9 फोर्ब्स रिच लिस्ट २०२२ नुसार ओ. पी. जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही सुमारे १४ हजार कोटी रुपये एवढी आहे. सावित्री जिंदाल एक यशस्वी उद्योगपती आहेतच सोबत त्या राजकारणातही सक्रिय आहेत. 2 / 9विनोद राय गुप्ता भारतातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्या हॅवल्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल गुप्ता यांच्या आई आहेत. त्यांची एकूण संपत्ती ६.३ बिलियन डॉलर आहे. 3 / 9राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला ह्या २०२२ च्या फोर्ब्स इंडिया रिचच्या यादीनुसार भारतातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ ५.९ बिलियन डॉलर आहे. 4 / 9नायकाच्या सीईओ फाल्गुनी नायर यांचंही नाव श्रीमंत महिलांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांची एकूण संपत्ती ४.०८ दशलक्ष डॉलर एवढी आहे. 5 / 9फार्मा आणि बायोटेक कंपनी यूएसव्ही प्रा.लि.च्या मालक लीना तिवारी या भारतातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. 6 / 9दिव्या गोकुलनाथ यांचं नावसुद्धा भारतातील दिग्गज टेक व्यावसायिकांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांनी २०११ मध्ये BYJU ची स्थापना केली होती. त्यांची नेटवर्थ ३.६ बिलियन डॉलर आहे. 7 / 9मल्लिका श्रीनिवासन ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेडच्या सीईओ आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ ही ३.४ बिलियन डॉलर आहे. 8 / 9बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडच्या फाऊंडर किरण मजूमदार-शॉ यांची एकूण नेटवर्थ ही २.७ बिलियन डॉलर एवढी आहे. भारताच्या श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचं स्थान आठवं आहे. 9 / 9थर्मैक्स कंपनीची १९९६ मध्ये स्थापना करणार्या अनु आगा यांना फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. त्यांची नेटवर्थ २.८ बिलियन डॉलर आहे.