By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:31 IST
1 / 7पालक मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम चिंतित असतात. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना विशेष विमा पॉलिसी घ्यावी लागते किंवा चाइल्ड एज्युकेशन प्लान निवडता येतो. 2 / 7विम्याच्या प्रीमियम दरमहा, सहा महिन्यांनी, वार्षिक स्वरूपात किंवा एकरकमी करता येते. त्यानंतर मॅच्युरिटी बेनिफिट मिळतो जो शिक्षणाच्या खर्चासाठी वापरला जाऊ शकतो. 3 / 7लाइफ इन्शुरन्स कव्हरेजमुळे जीवन विमा संरक्षण मिळते. माता-पित्यांपैकी कोणाचाही आकस्मिक मृत्यू झाल्यास मुलांना लाभ मिळवून दिला जातो. 4 / 7मॅच्युरिटीनंतर मुलाला वयाच्या आधारे पेमेंट एकरकमी किंवा ठराविक कालावधीनंतर दिले जाते. चाइल्ड एजुकेशन प्लानमुळे मुलांच्या गरजांसाठी तजवीज करता येते. 5 / 7आपत्कालीन स्थितीत त्वरित आर्थिक मदत मिळते व गुंतवणुकीवर हमखास परतावा मिळतो. याच्या मदतीने एज्युकेशन लोन मिळवणे सोपे होते.6 / 7चाइल्ड युलीप या प्रकारात पॉलिसी टर्मच्या मुदतीनंतर एकरकमी रक्कम मिळते. याचा लाभ मुलाच्या १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो. पालकाच्या मृत्यूच्या स्थितीत सम अॅश्युअर्डची संपूर्ण रक्कम दिली जाते. 7 / 7एंडोमेंट प्लानमध्ये सम अॅश्युअर्डसोबत बोनसच्या रूपात हमखास परतावा मिळतो, जीवन विमा संरक्षणही मिळते. इन्शुरन्समध्ये नियमित अंतराने निश्चित परतावा मिळतो.