Reseve Bank आणणार डिजिटल करन्सी; Deputy governor यांनी दिली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 09:46 IST
1 / 11भारतीय रिझर्व्ह बँक (Resrve Bank Of India) आता भारतात डिजिटल करन्सी लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रवि शंकर यांनी गुरूवारी यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली. 2 / 11रिझर्व्ह बँक आपली स्वत:ची डिजिटल करन्सी टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याच्या रणनितीवर काम करत आहे, अशी माहिती टी रवि शंकर यांनी दिली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. 3 / 11योजनेनुसार रिझर्व्ह बँक पायलेट आधारावर होलसेल आणि रिटेल क्षेत्रात डिजिटल करन्सी सुरू करण्याच्या तयारीत आहे. 4 / 11रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर यांच्या म्हणण्यानुसार विना सरकारी गॅरंटी असलेल्या डिजिटल करन्सीमधील चढ उताराच्या परिणामांपासून लोकांना वाचवण्याची आवश्यकता आहे.5 / 11त्यांचे संकेत बिटकॉईनसारख्या अनऑथोराईज्ड डिजिटल करन्सीवर होता. अनेक देशांच्या केंद्रीय बँक अशा प्रकारची करन्सी सादर करण्याच्या दृष्टीनं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 6 / 11वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार ग्राहकांचं डिजिटल करन्सीमध्ये दिसणाऱ्या अस्थिरतेच्या भयावह परिस्थिपासून संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. ज्याची कोणतीही सरकारी गॅरन्टी मिळत नाही, असं शंकर म्हणाले7 / 11सध्या रिझर्व्ह बँक आपली स्वत:ची डिजिटल करन्सी टप्प्याटप्प्यानं लागू करण्याच्या रणनितीवर काम करत आहे. ही अशा प्रकारे लागू केली जाईल ज्याचा बँकींग व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 8 / 11यासाठी कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचं मतही बोलताना शंकर यांनी व्यक्त केलं. Central Bank Digital Currency कोणत्याही देशाची केंद्रीय बँक जारी करते. 9 / 11या करन्सीला देशाच्या सरकारची मान्यता असते. तसंच त्या देशाच्या केंद्रीय बँकेच्या बॅलन्स शीटमध्येही त्याचा समावेश असतो. 10 / 11देशाची सॉवरन करन्सी जसा भारतात रूपयात बदलली जाऊ शकते. याला आपल्याप्रमाणे डिजिटल रूपयाही म्हणता येऊ शकतं.11 / 11डिजिटल करन्सी दोन प्रकाराची असते. त्यातील पहिला म्हणजे होलसेल आणि दुसरा रिटेल. रिटेल डिजिटल करन्सीचा वापर सामान्य लोक आणि कंपन्या करतात. होलसेल डिजिटल करन्सीचा वापर आर्थिक संस्थांद्वारे केला जातो.