शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio नं दिलं Airtel ला टेन्शन, २४० रुपयांत ८४ दिवस रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 1:18 PM

1 / 7
रिलायन्स जिओनं बाजारात एन्ट्री घेतल्यानंतर अन्य दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. आता जिओनं एअरटेलच्या तुलनेत स्वस्त किंमतीचा एक रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. परंतु याची मासिक किंमत मात्र अधिक आहे.
2 / 7
आम्ही तुम्हाला Jio च्या अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुमचा मासिक खर्च फक्त २४० रुपये असेल. तर या प्लॅनमध्ये नियमित मासिक प्लॅनपेक्षा जास्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध असेल. आम्ही ज्या प्लॅनबद्दल बोलत आहोत तो ७१९ रुपयांचा आहे.
3 / 7
जिओचा ७१९ प्लॅन ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, २९९ रुपयांमध्ये २८ दिवसांची वैधता ऑफर केली जाते. दोन्ही प्लॅन्स समान डेटा कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा देतात.
4 / 7
जर तुम्ही २९९ रुपयांचा प्लान ३ वेळा रिचार्ज केला तर तुम्हाला एकूण ८४ दिवसांची वैधता मिळेल. ज्याचा एकूण खर्च ८९७ वर येईल. तुम्ही ७१९ रुपयांचा प्लॅन एकाच वेळी रिचार्ज केल्यास तुम्हाला ८४ दिवसांसाठी समान फायदे मिळतील. अशा प्रकारे तुम्ही सुमारे १७८ रुपये वाचवू शकाल.
5 / 7
रिलायन्स जिओच्या ७१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. यादरम्यान तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २ जीबी डेटा सुविधा मिळते. याशिवाय १०० एसएमएसची सुविधाही मिळते. या प्लॅनमध्ये जिओ ॲप्सचाही लाभ घेता येतो.
6 / 7
जिओच्या २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ७१९ रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमसचा लाभ मिळतो. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडची मोफत सुविधा मिळते. परंतु याची वैधता २९ दिवस आहे.
7 / 7
जर तुम्ही पाहिलं तर ८४ दिवसांच्या वैधतेनुसार जिओच्या २९९ रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत ७१९ रुपयांचा प्लॅन बेस्ट ठरू शकतो. या प्लॅन द्वारे तुमची १७८ रुपयांची बचत होऊ शकते.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल