शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:34 IST

1 / 7
शेअर बाजारामधील सरकारी क्षेत्रातील कॅनरा बँकेच्या शेअरने गेल्या काही वर्षांत जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल ५८७ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा शेअर सोमवारी बीएसईवर १२७.६५ रुपयांच्या आपल्या ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.
2 / 7
या बँकेचा शेअर ९ ऑक्टोबर २०२० रोजी १८.४९ रुपयांवर होता. तो ६ ऑक्टोबर २०२५ रोजी १२७.६५ रुपयांवर पोहोचला. हा शेअर गेल्या चार वर्षांत सुमारे २६० टक्के, तीन वर्षांत १७८ टक्क्यांहून अधिक, दोन वर्षांत ७० टक्के तर गेल्या सहा महिन्यांत ४७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 / 7
याशिवाय, गेल्या एका महिन्यात बँकेच्या शेअर्समध्ये १८ टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. बँकेच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक ७८.५८ रुपये आहे.
4 / 7
प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी सप्टेंबर २०२५ तिमाहीत केनरा बँकेतील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. जून २०२५ तिमाहीत त्यांची हिस्सेदारी १.४६ टक्के होती, जी आता वाढून १.५७ टक्के झाली आहे.
5 / 7
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सध्या बँकेचे १४,२४,४३,००० शेअर्स आहेत, तर जून २०२५ मध्ये त्यांच्याकडे १३.२४ कोटी शेअर्स होते.
6 / 7
याशिवाय, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) यांचीही केनरा बँकेत मोठी गुंतवणूक आहे. एलआयसीकडे बँकेचे ४७,०१,०७,४६८ शेअर्स असून, त्यांची हिस्सेदारी ५.१८ टक्के आहे. ही आकडेवारी सप्टेंबर २०२५ तिमाहीपर्यंतची आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketस्टॉक मार्केट