शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

५००० कोटींच्या 'गुलाबी' नोटा कुठे गायब झाल्या?; २ हजारांच्या नोटांबाबत सर्वात मोठी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 17:51 IST

1 / 9
२०२३ मध्ये रिझर्व्ह बँकेने रद्द केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अद्यापही १००% पुन्हा बँकेकडे जमा झाल्या नाहीत. २०२५ च्या शेवटच्या दिवसाचा डेटा RBI कडून जारी करण्यात आला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, ५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या गुलाबी नोटा अजूनही परत येण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
2 / 9
याचा अर्थ, आरबीआयकडून ही नोट चलनातून रद्द करण्यात आल्यानंतरही इतक्या मोठ्या मुल्याचे चलन अजूनही जनतेच्या खिशात आहे. महत्त्वाचे म्हणजे, आरबीआयकडून या नोटा परत करण्याची सुविधा देऊनही लोकांकडून या नोटा परत करण्याचा वेग अत्यंत कमी आहे.
3 / 9
आतापर्यंत ९८.४१% गुलाबी नोटा परत आल्या आहेत. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटांबाबत एक महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, १९ मे २०२३ रोजी चलनातून काढून टाकण्यात आलेल्या या गुलाबी नोटांचे चलन पूर्णपणे परत झाल्या नाहीत.
4 / 9
त्यावेळी जवळपास ३.५६ लाख कोटी रुपयांच्या या मोठ्या नोटा चलनात होत्या आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण नोटांपैकी ९८.४१% नोटा परत आल्या आहेत. लोकांकडे अजूनही ५,६६९ कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटा आहेत.
5 / 9
दोन महिन्यांत फक्त १४८ कोटी रुपये परत आले. या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर आरबीआयने लोकांना या नोटा जमा करण्याची सुविधा दिली आणि सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या परतफेडीचा वेग खूपच वेगवान होता. मात्र कालांतराने त्या नोटा परत करण्याचा वेग बराच मंदावला आहे.
6 / 9
गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारी पाहता ३१ ऑक्टोबर रोजी या नोटांचे चलन ५,८१७ कोटी रुपये होते आणि आता लोक अजूनही ५,६६९ कोटी रुपयांच्या मोठ्या नोटा बाळगून आहेत. परिणामी या दोन महिन्यांत फक्त ₹१४८ कोटी किमतीच्या नोटा परत आल्या आहेत. चलनातून काढून टाकलेल्या या २,००० च्या नोटा पूर्णपणे मागे घेईपर्यंत कायदेशीर चलन राहतील असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले होते.
7 / 9
गुलाबी नोटा का बंद करण्यात आल्या? - नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या तेव्हा मध्यवर्ती बँकेने या मोठ्या चलनी नोटा बाजारात आणल्या. नोटाबंदीचा परिणाम कमी झाल्यानंतर आणि बाजारात पुरेशा प्रमाणात इतर मूल्यांच्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर मध्यवर्ती बँकेने १९ मे २०२३ रोजी क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत त्या चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली.
8 / 9
कुठे बदलायच्या नोटा? - २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्व बँक शाखांमध्ये लोकांना त्यांच्या नोटा बदलण्याची परवानगी दिली. चलनात असलेल्या नोटांच्या संख्येत घट झाल्यानंतर आरबीआयने बँकेऐवजी १९ आरबीआय कार्यालयांपुरती ही सुविधा मर्यादित केली, जिथे या नोटा अजूनही बदलता येऊ शकतात.
9 / 9
यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुअनंतपुरम येथील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांचा समावेश आहे. शिवाय, लोकांच्या सोयीसाठी आरबीआयने इंडिया पोस्टद्वारे कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून २००० रुपयांच्या नोटा पाठवण्याची सुविधा देखील प्रदान केली आहे.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक