शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबरदस्त! RBI देतेय तब्बल ४० लाख रुपये जिंकण्याची संधी; ‘हे’ काम करा अन् लखपती व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 4:12 PM

1 / 9
गेल्या अनेक दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI अनेकविध बँकांवर कायदे, नियमांच्या उल्लंघनप्रकरणी कोट्यवधींचे दंड ठोठावताना पाहायला मिळत आहे. खासगी क्षेत्रातील बँक असो वा सार्वजनिक क्षेत्रातील बँक असो, रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणावर दंडाचा बडगा उगारत आहे.
2 / 9
मात्र, भारतीय रिझर्व्ह बँक तुम्हाला आता ४० लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. ग्राहकांचे डिजिटल पेमेंट अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी RBI प्रथमच जागतिक हॅकथॉन आयोजित करत आहे. (RBI Global Hackathon)
3 / 9
RBI ने या हॅकथॉनची घोषणा केली असून, या हॅकथॉनची थीम डिजिटल पेमेंट अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनवणे आहे. ज्यामुळे त्यात आणखी सुधारणा करता येतील. यामध्ये तुम्हाला हे पैसे जिंकण्याची संधी मिळेल.
4 / 9
RBI च्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची आणि त्यांचे नाविन्यपूर्ण उपाय दाखवण्याची संधी मिळेल, असे बँकेने म्हटले आहे. यावर एक ज्युरी असेल जी प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांची निवड करेल.
5 / 9
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला ४० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचबरोबर दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला २० लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
6 / 9
रोख व्यवहार डिजिटल मोडमध्ये रूपांतरित करण्याचे नवीन आणि सोपे मार्ग शोधा. संपर्करहित किरकोळ पेमेंट सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करणे. डिजिटल पेमेंटमधील प्रमाणीकरण यंत्रणेच्या इतर पद्धतींचा शोध घेणे.
7 / 9
डिजिटल पेमेंट फ्रॉड आणि फसवणूक शोधण्यासाठी सोशल मीडिया विश्लेषण मॉनिटरिंग टूल तयार करणे, अशा प्रकारे रिझर्व्ह बँक या स्पर्धेतील विजेत्यांची निवड करणार आहे.
8 / 9
या हॅकथॉन स्पर्धेसाठी १५ नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नाव RBI ने हार्बिंझर २०२१ असे ठेवले आहे. दरम्यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून ४२१ कोटी व्यवहार झाले आहेत.
9 / 9
कोरोना संकटामुळे डिजिटल व्यवहारांसह रोखीच्या व्यवहारात काही प्रमाणात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या नोटबंदीचा उद्देश सफल झाला नसल्याचेही म्हटले जात आहे.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक