शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाची दुसरी लाट मागणीसाठी ठरली मोठा झटका : रिझर्व्ह बँक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 9:25 AM

1 / 15
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मागणीवर मोठा प्रभाव पडल्याची माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली.
2 / 15
मागणीच्या तुलनेत पुरवठ्यावर मात्र परिणाम झाला नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं.
3 / 15
गेल्या वर्षीच्या तुलनेत हे संकट इतकं गंभीर नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.
4 / 15
सोमवारी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून आली. परंतु महासाथीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही ४ हजारांच्या वर होती.
5 / 15
जाणकारांच्या मते ही आकडेवारी भरवसा करण्यासारखी नसून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या ठिकाणी चाचण्यांची व्यवस्थाही पुरेशी नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
6 / 15
'कोरोनाच्या संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागणीत घट झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हान उभं राहिलं आहे,' असं रिझर्व्ह बँकेनं आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटलं.
7 / 15
'देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागणीवर परिणाम झाल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.
8 / 15
याशिवाय लोकांची बचत करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आणि रोजगाराच्या नव्या संधी कमी झाल्यानं मागणीवर परिणाम झाला आहे.
9 / 15
इन्वेन्टरी जमा असल्यामुळे संपूर्ण पुरवठ्यावर कमी परिणाम झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.
10 / 15
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या केसेसमध्ये घट होताना दिसत आहे आणि त्याचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक परिस्थिवर परिणाम जाणवण्याची शक्यता नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.
11 / 15
सध्या या बाबात काहीही सांगितलं जाऊ शकत नाही. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती तितकी गंभीर नसल्याचंही रिझर्व्ह बँकेनं बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.
12 / 15
अनेक राज्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लॉकडाऊन केलं आहे. यासोबतच लोकांनी Work from Home सुरू केल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.
13 / 15
देशात ऑनलाईन डिलिव्हरी वाढवली आहे, तसंच डिजिटल पेमेंट आणि ई कॉमर्सचा वापरही वाढल्याचं रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं.
14 / 15
या महिन्याच्या सुरूवातीला रिझर्व्ह बँकेनं कर्ज देणाऱ्या संस्थांना बॅड लोनच्या वाढत्या समस्येतून दिलासा देण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली होती.
15 / 15
यासोबतच काही लोकांना आपल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी थोडा वेळ देण्याचीही घोषणा केली होती.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतjobनोकरी