Ratan Tata Birthday : जेव्हा आपल्याच कंपनीत नोकरीसाठी टाटांना बनवावा लागला होता CV, रंजक आहे किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 10:29 IST
1 / 986th Birthday of Ratan Tata: रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नाहीत तर टाटा समूहाला नव्या उंचीवर नेऊन देश आणि जगात मोठे नाव कमावणारे व्यक्तिमत्त्व देखील आहे. परंतु तरीही ते नेहमीच जमिनीशी जोडलेले राहिले. 2 / 9समाजाच्या भल्यासाठी त्यांनी आजवर खूप काम केलं आहे. रतन टाटा हे आज एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात, परंतु रतन टाटा यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक कर्मचारी म्हणून केली होती हे फार कमी लोकांना माहीत आहे.3 / 9त्यांची पहिली नोकरी टाटा समूहामध्ये नाही, तर दुसऱ्या कंपनीत केली होती. त्याच कंपनीत काम करत असताना रतन टाटा यांनी टाटा समूहामध्ये नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा बायोडाटा बनवला होता. आज रतन टाटा त्यांचा ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्तानं जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील हा रंजक किस्सा.4 / 9ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा रतन टाटा शिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 5 / 9पण दरम्यानच्या काळात त्यांच्या आजी लेडी नवजबाई (Lady Navajbai) यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना भारतात परतावं लागलं. भारतात परतल्यानंतर, रतन टाटा यांनी टाटा समूहात पहिली नोकरी स्वीकारली नाही, परंतु IBM मध्ये रुजू झाले आणि त्यांच्या कुटुंबातील कोणालाही याबद्दल कल्पना नव्हती.6 / 9टाटा समूहाचे तत्कालीन चेअरमन जेआरडी टाटा यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ते अतिशय नाराज झाले आणि त्यांनी रतन टाटा यांना फोन केला. 'तुम्ही भारतात राहून आयबीएमसाठी काम करू शकत नाही,' असं म्हणत त्यांनी रतन टाटा यांना त्यांचा बायोडेटा शेअर करण्यास सांगितलं.7 / 9मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे मानलं तर त्यावेळी रतन टाटा यांच्याकडे त्यांचा बायोडाटा नव्हता, त्यामुळे त्यांनी आयबीएम ऑफिसमध्ये इलेक्ट्रिक टाइपरायटरवर टाईप करून त्यांचा बायोडाटा तयार केला. त्यांचा बायोडेटा शेअर केल्यानंतर त्यांना १९६२ मध्ये टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळाली. 8 / 9टाटा कुटुंबातील सदस्य असूनही नोकरी स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांना त्यांच्या कंपनीतील सर्व कामं करावी लागली. सर्व कामांचा अनुभव घेत ते कंपनीच्या उच्च पदापर्यंत पोहोचले.9 / 9१९९१ मध्ये रतन टाटा यांनी टाटा सन्स आणि टाटा समूहाचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांनी २१ वर्षे टाटा समूहाचे नेतृत्व केले आणि समूहाला मोठ्या उंचीवर नेले. त्यांच्या नेतृत्वाखाली टेटली टी, जग्वार लँड रोव्हर आणि कोरस या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आलं. त्यांच्या देखरेखीखाली टाटा समूहाचा १०० हून अधिक देशांमध्ये विस्तार झाला. टाटा नॅनो कार ही देखील रतन टाटांची संकल्पना होती.