1 / 10Paytm चा IPO लवकरच येण्याची शक्यता आहे. परंतु कंपनीचा आयपीओ येण्यापूर्वीच One97 Communication च्या संचालक मंडळावरून सर्व चिनी नागरिक हटले आहेत.2 / 10यामध्ये प्रमुख गुंतवणूकदार Ant समुहाच्या प्रतिनिधिंचाही समावेश असेल. या समुहाचं प्रतिनिधीत्व आता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील डॉगलस फिगिन हे करणार आहेत. 3 / 10Paytm नं याच वर्षी आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा आयपीओ २१,८०० कोटी रूपयांचा असू शकतो. पेटीएम या कंपनीचं संचालन One97 Communication द्वारे करण्यात येतं.4 / 10या कंपनीच्या जवळपास ३९ सब्सिडायरीस आहेत. पेटीएमच्या प्रमुख शेअरधारकांमध्ये चीनच्या अलिबाबा समुहाच्या अँट ग्रुप, सॉफ्टबँक व्हिजन फंड, सॅफ पार्टनर्स यांचा समावेश आहे. विजय शेखर शर्मा यांची यात १४.६७ टक्के भागीदारी आहे.5 / 10पेटीएमची पेरेंट कंपनीनं रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला दिलेल्या माहितीनुसार Ant फायनॅन्शिअलचे गुओमिंग चेंग आणि अलिपेचे जिंग शियांगडोंग यांनी कंपनीतील आपलं पद सोडलं आहे. हे दोन्ही चिनी नागरिक आहेत.6 / 10त्यांच्याशिवाय अमेरिकन नागरिक मायकल युएन जेयाओ आणि चिनी नागरिक तिंग हांग केन्नी यांनीदेखील आपलं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 7 / 10संचालक मंडळात ज्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये Ant Group च्या Douglas Feagin यांचा समावेश आहे. ते अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यांनी यापूर्वी गोल्डमॅन सॅक्ससोबत काम केलं होतं.8 / 10त्यांच्याशिवाय भारतीय नागरिक अशित लिलानी आणि विकास अग्निहोत्री यांचादेखील कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. लिलानी हे Saama कॅपिटलचे प्रतिनिधी आहेत, तर अग्निहोत्री हे जपानच्या सॉफ्ट बँकचे प्रतिनिधी आहेत.9 / 10One97 Communications कंपनी पेटीएमचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. तसंच या अंतर्गत कंपनी आपला २५ टक्के हिस्सा शेअरधारकांना देऊ शकते. 10 / 10याशिवाय कंपनीच्या संचालक मंडळानं ५.४ लाख इक्विटी शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे.