1 / 6इटालियन फॅशन ब्रँड 'प्राडा'ने (Prada) कोल्हापुरी चप्पलची हुबेहुब नक्कल केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भारताला श्रेय न दिल्याने मुंबई उच्च न्यायालयात प्राडाविरोधात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे.2 / 6या याचिकेत प्राडाने भारतीय कारागिरांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्राची पारंपरिक ओळख आहे.3 / 6बौद्धिक संपदा हक्कांचे (Intellectual Property Rights) वकील गणेश एस. हिंगेमिरे यांनी २ जुलै रोजी ही याचिका दाखल केली आहे. प्राडाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.4 / 6तसेच, भारतीय पारंपरिक डिझाईन्सचे संरक्षण करण्यासाठी सरकारने योग्य निर्देश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे. जीआय-टॅग (Geographical Indication - GI Tag) असलेल्या उत्पादनाचे हे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे.5 / 6या अनधिकृत वापरामुळे महाराष्ट्रातील संबंधित कारागीर समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे, असे याचिकेत स्पष्ट नमूद केले आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अशा जीआय उत्पादनांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.6 / 6यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पारंपरिक उत्पादनांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण होण्याची शक्यता आहे. ही याचिका भारतीय कारागिरांच्या हक्कासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.