शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलींना, ज्येष्ठांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात पोस्टाच्या 'या ' स्कीम; सर्वाधिक व्याज, परताव्याचीही हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 8:27 AM

1 / 7
भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करणं आवश्यक आहे. परंतु बरेच जण हमी परतावा आणि सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असतात. अशात पोस्टाच्या काही स्कीम्स तुमची गुंतवणूक सुरक्षित तर ठेवतातच, पण तुम्हाला चांगला परतावादेखील देतात.
2 / 7
केंद्र सरकारनं मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. याशिवाय वृद्धांनाही सेवानिवृत्तीनंतर पैशाची फार चिंता असते कारण अनेकांकडे बचतीशिवाय उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नसतं. अशा परिस्थितीत, त्यांच्या ठेवी अशा ठिकाणी गुंतवणे अत्यंत आवश्यक आहे जिथे त्यांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांना त्यावर व्याजाचीदेखील हमी मिळेल.
3 / 7
मुलींच्या भवितव्याची चिंता दूर करण्यासाठी आणि वृद्धांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. येथे आम्ही तुम्हाला अशा दोन योजनांबद्दल सांगणार आहोत ज्या मुलींच्या उज्ज्वल भविष्य आणि वृद्धांना चांगल्या व्याजदराचा लाभ देण्यासाठी चालवल्या जातात. या दोन्ही योजनांवर सरकार ८.२ टक्के व्याज देत आहे. या दोन्ही योजनांचे लाभ कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेतून घेता येऊ शकतात.
4 / 7
सुकन्या समृद्धी - सरकार मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना चालवते. जर तुमच्या मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही योजना २१ वर्षांनंतर मॅच्युअर होते, परंतु यामध्ये मुलीच्या पालकांना १५ वर्षांसाठी रक्कम जमा करावी लागते. यामध्ये वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात.
5 / 7
जितक्या लवकर तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी पैसे जमा करू शकाल. सध्या त्यावर ८.२ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही १५ वर्षांसाठी वार्षिक १.५ लाख रुपये जमा केले, तर सध्याच्या ८.२ टक्के दरानं, तुम्ही ६९,२७,५७८ रुपये म्हणजेच मॅच्युरिटीवर सुमारे ७० लाख रुपये जमवू शकता.
6 / 7
सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम - जर तुम्ही सेवानिवृत्त असाल आणि चांगल्या व्याजदराच्या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता. ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. त्याचवेळी व्हीआरएस घेणारे सिव्हिल सेक्टरमधील सरकारी कर्मचारी आणि संरक्षण क्षेत्रातून निवृत्त होणाऱ्या लोकांना काही अटींसह वयात सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिक कमाल ३०,००,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि ठेवलेल्या रकमेवर चांगले व्याजदर मिळवू शकतात. किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये आहे.
7 / 7
या योजनेतही सरकार ८.२ टक्के व्याज देते. तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त ५ वर्षांसाठी या खात्यात पैसे जमा करू शकता आणि ते खातं एका वेळी ३ वर्षांपर्यंत वाढवू शकता. जर तुम्ही या खात्यात ३०,००,००० रुपये जमा केले, तर ५ वर्षांत ८.२ टक्के व्याजदरानं, तुम्ही केवळ व्याजातून १२,३०,००० रुपये कमवू शकता. अशा प्रकारे, ५ वर्षानंतर मॅच्युरिटीची रक्कम ४२,३०,००० रुपये होईल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक