PMAY : घर खरेदी करण्यावर ३१ मार्चपर्यंतच मिळणार २.६७ लाखांची सूट; पात्र असल्यास 'असा' करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:39 IST
1 / 20पंतप्रधान आवास योजना ही भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश लोकांना शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये कमी किंमतीत घर उपलब्ध करून देणं हा आहे.2 / 20या अंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना CLSS किंवा क्रेडिट लिंक्ड अनुदान देण्यात येते. याचाच अर्थ घर खरेदी करण्यासाठी होम लोनवर ग्राहकांना अनुदान मिळतं. 3 / 20या अंतर्गत ग्राहकांना सर्वाधित २.६७ लाख रूपयांचं अनुदान देण्यात येतं. ही केंद्र सरकारद्वारे चालवण्यात येणारी एक योजना आहे. 4 / 20याचा फायदा ग्राहकांना केवळ ३१ मार्च २०२१ पर्यंत घेता येईल. याचाच अर्थ या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांसाठी अवघे काही दिवस उरले आहेत.5 / 20३१ मार्च नंतर ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येणार नाही.6 / 20 पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्याच लोकांना लाभ मिळेल ज्यांचं वार्षिक उत्पन्न ६ लाख ते १८ लाख रूपयांच्या दरम्यान असेल.7 / 20तर दुसरीकडे ३ लाख ते ६ लाख रूपये उत्पन्न असलेल्या लोकांना EWS आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांना LIG, ६ ते १२ लाख रूपये उत्पन्न असलेल्या लोकांना MIG1 आणि १२ ते १८ लाख रूपये उत्पन्न असलेल्या लोकांना MIG2 या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. 8 / 20जर तुमचं उत्पन्न वर्षाला ६ लाख रूपये आहे, तर तुम्हाला कर्जावर ६.५ टक्के क्रेडिट लिंक्ड अनुदान मिळेल. 9 / 20ज्यांचं उत्पन्न वर्षाला १२ लाख रूपयांपर्यंत आहे त्यांना वर्षाला ९ लाख रूपयांपर्यंतच्या कर्जावर ४ टक्के व्याज अनुदान मिळेल. 10 / 20तसंच १८ लाख रूपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना १२ लाख रूपयांच्या कर्जावर ३ टक्के व्याज अनुदान मिळेल. 11 / 20यासाठी असलेली एक महत्त्वाची अट म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं भारतात पक्कं घर असू नये. 12 / 20याशिवाय या योजनेचा लाभ कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं यापूर्वी घेतलेला असू नये.13 / 20याशिवाय या योजनेचा लाभ कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं यापूर्वी घेतलेला असू नये. जर तुमचं लग्न झालं असेल तर एकट्यानं किंवा दोघांनी मिळूनही अर्ज करण्याची परवानगी आहे. यासाठी एकच अनुदान देण्यात येईल.14 / 20यासाठी ग्राहकांना ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, मतदान ओळखपत्र किंवा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या ओळखपत्रांचा वापर करता येऊ शकतो. 15 / 20यासाठी ग्राहकांना ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, मतदान ओळखपत्र किंवा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या ओळखपत्रांचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय उत्पन्नाचा पुरावा म्हणून ६ महिन्यांचं बँक स्टेटमेंट, आयटीआर आणि २ महिन्यांची सॅलरी स्लीप द्यावी लागेल. 16 / 20तसंच प्रॉपर्टी प्रुफ म्हणून सेल्स डीड, अॅग्रीमेंट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पैसे दिल्याची रसिटही द्यावी लागेल.17 / 20यासाठी ग्राहकांना या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा https://pmaymis.gov.in/ या संकेतस्थळावर जावं लागेल.18 / 20जर तुम्ही LIG, MIG किंवा EWS कॅटेगरीत येता तर अन्य ३ कंपोनन्ट्सवर क्लिक करा. पहिल्या कॉलममध्ये आधार क्रमांक तर दुसऱ्या कॉलममध्ये आपलं नाव भरा19 / 20यानंतर जे पेज ओपन होईल त्यात पूर्ण माहिती भरा. त्यानंतर खाली माहितीची खात्री करण्यासाठी असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.20 / 20माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड दिसेल. तो भरल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सबमिट करा.