शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Free LPG कनेक्शन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार सब्सिडीच्या नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 6:21 PM

1 / 8
नवी दिल्ली : तुम्ही जर केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत (Ujjwala scheme) मोफत LPG कनेक्शन (free LPG connection) घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
2 / 8
उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या स्वरुपात केंद्र सरकार लवकरच बदल करण्याची शक्यता आहे. 'मनी कंट्रोल' ने दिलेल्या बातमीनुसार पेट्रोलियम मंत्रालय 2 नव्या स्ट्रक्चरवर सध्या काम करत आहे. त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यात येईल.
3 / 8
केंद्र सरकारने या बजेटमध्ये एक कोटी नवे कनेक्शन देण्याची घोषणा केली होती. आता सरकार OMCs च्या माध्यमातून पेमेंट मॉडेलमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
4 / 8
नव्या प्रकारानुसार 1600 रुपयांचे अगाऊ पेमेंट (advance payment) कंपनी एकरकमी वसूल करणार आहे. सध्या OMCs च्या माध्यमातून ही रक्कम EMI च्या माध्यमातून वसूल करण्यात येते. तर या योजनेतील अन्य 1600 रुपयांची सबसिडी सरकार यापुढे देखील देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
5 / 8
सरकारच्या या योजनेनुसार ग्राहकांना 14.2 किलो वजनाचे सिलेंडर आणि स्टोव्ह दिला जातो. याची एकूण किंमत 3200 रुपये आहे. यापैकी 1600 रुपयांची सबसिडी सरकारकडून देण्यात येते. तर अन्य 1600 रुपये OMCs च्या माध्यमातून दिले जातात. OMCs रिफील केल्यानंतर सबसिडीची रक्कम ग्राहकांकडून EMI च्या माध्यमातून वसूल केली जाते.
6 / 8
या योजेनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करणे खूप सोपे आहे. BPL कुटुंबातील कोणतीही महिला या योजेनेसाठी अर्ज करु शकते. या योजनेची सर्व माहिती pmujjwalayojana.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
7 / 8
या योजनेच्या अंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्व प्रथम एक फॉर्म भरुन तो जवळच्या LPG वितरकाकडे जमा करावा लागेल. या फॉर्ममध्ये लाभार्थी महिलेला पूर्ण पत्ता, जनधन बँक अकाऊंट नंबर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार कार्ड नंबर द्यावा लागेल.
8 / 8
या फॉर्मची योग्य पडताळणी केल्यानंतर गॅस कंपन्या योग्य लाभार्थींना LPG कनेक्शन जारी करते. एखाद्या ग्राहकाने EMI च्या माध्यमातून पैसे देण्याचा पर्याय निवडला तर त्या रकमेचा सिलेंडरच्या माध्यमातून मिळणाऱ्या सबसिडीमध्ये समावेश करण्यात येतो.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर