जर 'हा' अंदाज खरा ठरला तर पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार! जाणून घ्या, कुठपर्यंत पोहोचू शकते किंमत?

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 24, 2021 10:42 PM2021-02-24T22:42:14+5:302021-02-24T22:49:00+5:30

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणून हैराण झाला आहे. कारण प्रत्येकावरच याचा परिणाम होताना दिसत आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी व्हाव्यात अशीच सर्वांची इच्छा आहे. यासाठी जनता सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहे. (Petrol-Diesel Brent crude oil price may be cross 100 dollars per barrel in next 2 year)

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य माणून हैराण झाला आहे. कारण प्रत्येकावरच याचा परिणाम होताना दिसत आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी व्हाव्यात अशीच सर्वांची इच्छा आहे. यासाठी जनता सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहे. (Petrol-Diesel Brent crude oil price may be cross 100 dollars per barrel in next 2 year)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता - खरे तर प्रेट्रोल-डिझेलचे दर रोज सकाळी पेट्रोल कंपन्या निश्चित करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारावरून देशातील कंपन्या या किमती निश्चित करतात. यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्तवला जात आहे.

कच्चा तेलाच्या किमती 100 डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता - अजरबॅजानची ऑईल ट्रेडिंग कंपनी सोकार ट्रेडिंग एसए (Socar Trading SA)ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 18 ते 24 महिन्यांत बेंचमार्क ब्रेंट (Brent) ट्रिपल डिजिटला स्पर्ष करू शकते. अर्थात अंतरराष्ट्रीय बाजारांत ब्रेंट क्रूड म्हणजे कच्चा तेलाच्या किमती 100 डॉलर प्रती बॅरलच्याही पुढे जाऊ शकतात.

पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्याही पुढे जाण्याची शक्यता - येणाऱ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपये लिटरलच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या दिल्लीत पेट्रोल 90.93 रुपये तर डिझेल 81.32 रुपये लीटर आहे.

ब्रेंट क्रूडचा भाव 66 डॉलर प्रती बॅरल - बँक ऑफ अमेरिकानेही (Bank of America) अंदाज वर्तवला आहे, की पुढील काही दिवसांत कच्चा तेलाच्या किमती 100 डॉलर प्रती बॅरलच्याही पुढे जाऊ शकतात.

सध्या ब्रेंट क्रूडचा दर 66 डॉलर प्रती बॅरल एवढा आहे.

19 डॉलर प्रती बॅरलपर्यंत घसल्या होत्या कच्च्या तेलाच्या किमती - कोरोना संकटाच्या काळात कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. या काळात कच्चा तेलाचा दर 18 वर्षांत सर्वात कमी म्हणजेच 19 डॉलर प्रती बॅरलपर्यंत आला होता. यानंतर सातत्याने कच्चा तेलाच्या किमती वाढत आहेत.

शेअर बाजारातील ऑप्शंस मार्केटमध्ये डिसेंबर-2022 साठी तेलाच्या किमतींवर 100 डॉलरपेक्षाही अधिकच्या भावावर बोली लावली जात आहे.