शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm Share: काय होतं, काय झालं! २०२२ मध्ये पेटीएमचा शेअर ६० टक्क्यांनी आपटला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 11:12 AM

1 / 6
शेअर बाजारात कधी चक्र तुमच्या बाजूनं फिरेल आणि कधी तुमच्या विरोधात फिरेल हे सांगणं तसं कठीण आहे. अनेक जण आयपीओमध्ये पैसे कमावण्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करत असतात.
2 / 6
परंतु असेही काही शेअर्स आहेत, ज्यांचा आयपीओ येऊन १ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे आणि त्यांनी गुंतवणूकदारांना नफा सोडा, त्यांचं नुकसानच केलंय. आम्ही तुम्हाला आज पेटीएमबद्दल सांगत आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना २०२२ मध्ये मोठं नुकसान सोसावं लागलंय.
3 / 6
Paytm ने नोव्हेंबर 2021 मध्ये अत्यंत हाय व्हॅल्युएशनवर आपला IPO लाँच केला. त्यादरम्यान, पेटीएमकडून गुंतवणूकदारांना सांगण्यात आले की कंपनीचा स्टॉक येत्या काळात आयपीओच्या किमतीच्या वर जाईल. तथापि, असे होऊ शकले नाही आणि पेटीएमच्या स्टॉकमध्ये सातत्यानं घसरण दिसून आली. आता परिस्थिती अशी आहे की पेटीएमचा स्टॉक प्रचंड दबावाखाली दिसत आहे.
4 / 6
त्याच वेळी, २०२२ मध्ये पेटीएमच्या शेअरमच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. पेटीएमचा स्टॉक २०२२ या वर्षात ६० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या वर्षी NSE वर पेटीएमच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १३५० रुपये होती तर पेटीएमची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ४३८.३५ रुपये होती.
5 / 6
३१ डिसेंबर २०२१ रोजी पेटीएमच्या शेअरची किंमत १३३४.५५ रुपये होती. २०२२ या वर्षाच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी पेटीएमचा शेअर आतापर्यंत ६६ टक्क्यांनी घसरून ५३०.७० रुपयांवर बंद झाला.
6 / 6
नोव्हेंबर २०२१ मध्ये आलेल्या Paytm च्या स्टॉकची IPO इश्यू किंमत २१५० रुपये होती पण त्याचं लिस्टिंग १९५० रुपयांवर झालं होती. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी लिस्टिंगच्या दिवशी स्टॉकची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आणि लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक १५६४ रुपयांवर बंद झाला. (टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :Paytmपे-टीएमshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक