LIC मध्ये दररोजचे ७६ रुपये भरा; १० लाख मिळवा, सोबत लाईफ टाईम कव्हरही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:21 PM2021-09-29T14:21:58+5:302021-09-29T14:25:11+5:30

lic jeevan anand policy in Marathi; LIC च्या न्‍यू जीवन आनंद पॉलिसीद्वारे तुम्हाला अनेक प्रकराचे फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला लाईफ टाईम कव्हर मिळते. सोबत बोनसही दिला जातो. ही पॉलिसी तुमच्या आयुष्य़भरासाठी सिक्युअर आहे.

भारतीयांसाठी एलआयसी आणि पोस्ट हे दोन पर्याय असे आहेत जे गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम आहेत. एलआयसीची नवीन जीवन आनंद पॉलिसी ग्राहकांना फक्त बचतच देत नाही तर सुरक्षा देखील प्रदान करते. (lic jeevan anand policy in Marathi.)

या योजनेमध्ये तुम्हाला बोनसदेखील दिला जातो. या स्कीममध्ये रिस्क कव्हर (Risk Cover) पॉलिसीच्या मुदतीनंतरही सुरु राहते. यासाठी तुम्हाला दिवसाला फक्त ७६ रुपयांची बचत करावी लागणार आहे.

LIC च्या न्‍यू जीवन आनंद पॉलिसीद्वारे तुम्हाला अनेक प्रकराचे फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला लाईफ टाईम कव्हर मिळते. सोबत बोनसही दिला जातो. ही पॉलिसी तुमच्या आयुष्य़भरासाठी सिक्युअर आहे.

जर तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही एलआयसी न्यू जीवन आनंद स्कीम घेऊ शकता. ही स्कीम घेण्यासाठी तुमचे जास्तीत जास्त वय हे ५० वर्षे आहे. या योजनेतून कमीतकमी १ लाख रुपयांसाठी सम अश्युअर्ड घेणे गरजेचे आहे. यासाठी अधिक मर्यादा नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ही सम अश्युअर्ड निवडू शकता.

सम अश्युअर्ड + सिंपल रिवर्सनरी बोनस + फायनल अॅडिशनल बोनस असे ५ लाख + 5.04 लाख + 10 हजार = 10.14 लाख होतात. जर तुम्ही पॉलिसीला २१वर्ष पूर्ण होईपर्यंत असाल तर १० लाखांपेक्षा जास्त पैसे मिळतात.

पॉलिसीमध्ये १५ वर्षए सलग पैसे भरल्यास बोनस मिळतो. यामध्ये गुंतवणूकदार रोज ७६ रुपये जमा करून १०.३३ लाख रुपये मिळवू शकतो. जर २४ वर्षांचा गुंतवणूकदार ५ लाख रुपयांचा पर्याय निवडत असेल तर त्याला 26,815 चा प्रमिअम भरावा लागेल. जो 2281रुपये प्रति महिना व ७६ रुपये प्रति दिवस होतो.

पॉलिसी मॅच्युअर होण्याआधी जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला सम अश्युअर्ड ५ लाख रुपये मिळतात. पॉलिसी सुरु असताना जर मृत्यू झाला तर नॉमिनीला 125 टक्के रक्कम दिली जाते. याचसोबत बोनस आणि अंतिम बोनस देखील दिला जातो. १७ वर्षानंतर मृत्यू झाला तर नॉमिनीला तिन्हीपैकी जे जास्त असेल ते दिले जाते.

सम अश्युअर्ड चे 125% = 5 लाख चे 125% = 6,25,000 रुपये. वार्षिक प्रीमियम चे 10 पट = (27010 चे 10 पट) = 3,02,730रुपये. मृत्यु पर्यंत भरलेल्या प्रीमियमचे 105% = (27010 * 17) चे 105% = 4,82,128 रुपये. पहिल्या पर्यायात जास्त रक्कम असल्याने ती नॉमिनीला मिळेल.