शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ATM मधून पैसे काढताना नक्की या गोष्टींकडे द्या लक्ष, अन्यथा होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 5:13 PM

1 / 6
ATM Cash Withdrawals : आता अनेक महत्त्वाची कामे कॅश नसतानाही केली जातात. तुम्ही ऑनलाइन पेमेंट अॅप्सद्वारे पेमेंट करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकता. पण, एटीएममधून पैसे काढण्याची गरज पूर्णपणे संपलेली नाही. पण, एटीएममधून पैसे काढताना तुमची फसवणूक होऊ शकते.
2 / 6
यामुळे एटीएममधून पैसे काढताना काळजी घेणे आवश्यक आहे. एक छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते. आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहोत याचे पालन करून तुम्ही सुरक्षितरित्या पैसे काढू शकता.
3 / 6
एटीएम पिन बदलण्याचा अर्थ असा नाही की तो रोज बदलला पाहिजे. यामुळे तुम्हाला पिन लक्षात ठेवण्यात खूप अडचणी येतील आणि 3 वेळा चुकीचा पिन टाकल्यास कार्ड ब्लॉक होईल. तुमचा एटीएम पिन दर 2 ते 3 महिन्यांनी बदला.
4 / 6
एटीएम वापरताना अनेक ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक एटीएममध्ये कार्ड पेमेंट प्रोसेस होईपर्यंत येत नाही. अशा परिस्थितीत ते एटीएमजवळ उभ्या असलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेतात. अज्ञात व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. जर तुम्हाला एटीएम मशीन कसे वापरायचे हे माहित नसेल, तर तुमच्या ओळखीच्या आणि विश्वासू व्यक्तीला घेऊन जा.
5 / 6
अनेक वेळा एकाच ठिकाणी दोन किंवा अधिक एटीएम बसवले जातात. अशा वेळी तुमच्या शेजारी उभी असलेली अज्ञात व्यक्ती फसवणूक करणारा ठरू शकतो. यामुळे तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. एटीएमवर पिन टाकताना तुम्ही दुसऱ्या हाताने तो लपवण्यासारखी युक्ती वापरू शकता.
6 / 6
यामुळे तुमच्या मागे किंवा शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला तुमच्या एटीएम कार्डचा पिन कळणार नाही. एटीएम वापरताना आजूबाजूला नक्की पाहा. जर तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर दुसऱ्या एटीएममध्ये जाणे चांगले.
टॅग्स :bankबँकatmएटीएम