आता घरबसल्या काढता येणार पीएफचे पैसे, जाणून घ्या प्रोसेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 11:48 IST
1 / 10कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला जमा होणारी रक्कम निवृत्तीच्या वेळी मिळते. 2 / 10याचा मोठा फायदा उतारवयात होतो. आता पीएफ आपत्कालीन परिस्थितीतही काढता येणार आहे. अडचणीत असलेल्यांना त्याचा फायदा होणार आहे.3 / 10कोरोनाच्या काळात अनेकांना पैशांची जास्त गरज होती. या दरम्यान, ईपीएफओमुळे कोविड ॲडव्हान्स काढणे लोकांना फायदेशीर ठरले. जर तुम्हीही कोविडमुळे त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून काही रक्कम काढू शकता.4 / 10पीएफ काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही कोविड ॲडव्हान्स काढू शकता. ईपीएफओने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. 5 / 10ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, तुम्ही घरबसल्या उमंग ॲपद्वारे कोविड ॲडव्हान्स काढू शकता. उमंग ॲपवर ईपीएफओकडून अनेक सेवा दिल्या जातात. यामध्ये शिल्लक रक्कम तपासण्यापासून ते नॉमिनी जोडण्यापर्यंतच्या सेवांचा समावेश आहे.6 / 10सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर तुम्ही मोबाईल नंबर आणि एमपिन टाका. आता तुमचे आधारकार्ड उमंग ॲपशी लिंक करा.7 / 10ॲपवर लॉग इन केल्यानंतर, आता तुम्ही ऑल सर्व्हिस विभागात जा. येथे तुम्हाला ईपीएफओचा पर्याय निवडावा लागेल.8 / 10ड्रॉप डाऊन मेनूमध्ये, दावा दाखल करा (रेज क्लेम) हा पर्याय निवडा. आता तुम्हांला तुमचा यूएएन नंबर टाकावा लागेल.9 / 10यूएएन नंबर टाकल्यानंतर काही वेळाने तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. ओटीपी टाकताच दावा नोंदवला जाईल.10 / 10शेवटी तुम्हांला संदर्भ क्रमांक (रेफरेन्स नंबर) दिला जाईल, त्यानंतर तुम्ही क्लेमची स्थिती तपासू शकता.