शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nitin Gadkari: गडकरींची मोठी योजना! ‘फ्लेक्स’ इंजिन तीन महिन्यांत; इंधनात ३० ते ३५ रुपयांची बचत होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 2:06 PM

1 / 13
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देशातील ७ हून अधिक राज्यांमध्ये पेट्रोल दराने १०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. (flex engines in vehicles)
2 / 13
तर, पेट्रोलपाठोपाठ डिझेलनेही शंभरी ओलांडल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यावर मोठी योजना तयार करत आहेत. ही योजना आगामी तीन महिन्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
3 / 13
इथेनॉलचा वापर करून चालू शकणारी फ्लेक्स इंजिन वाहनांना बसवण्यासाठी येत्या ३ महिन्यांत योजना आणली जाईल, अशी घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. (ethanol based flex engines)
4 / 13
स्थानिक शेतमालाचा वापर करून तयार होत असलेल्या इथेनॉलचा वापर वाढून पेट्रोल व डिझेल या पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व यामुळे कमी होईल, असा विश्वास नितीन गडकरींनी यावेळी व्यक्त केला.
5 / 13
इंडियन बँकेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, ब्राझील, अमेरिका आणि कॅनडा या देशांतून फ्लेक्स इंजिनाचा वापर सुरू झाला आहे. यामुळे तेथे बीएमडब्ल्यू, मर्सिडिज आणि टोयाटो या कार उत्पादक कंपन्यांना फ्लेक्स इंजिनाची निर्मिती करणे भाग पडले आहे.
6 / 13
स्थानिक पातळीवर शेतमालापासून बनवलेले इथेनॉल इंधन म्हणून वापरणे हे भारतासारख्या देशाला निश्चितच परवडणारे आहे. त्यामुळे कच्च्या खनिज तेलाची आयातही कमी करण्यात यश येऊ शकेल.
7 / 13
यामुळे खर्च कमी होईल आणि प्रदुषणही कमी होईल. एक लीटर पेट्रोल १०० रुपयांना मिळत असेल, तर त्या तुलनेत एक लीटर इथेनॉल ६० ते ६२ रुपयांना मिळते, याकडे नितीन गडकरींनी यावेळी लक्ष वेधले.
8 / 13
यासंदर्भात सरकार एक योजना आणणार असून, येत्या तीन महिन्यांत ती लागू होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यासाठी सरकारने १०० टक्के इथेनॉलची विक्री करणारे पंप बसवण्यासाठी परवाने देण्यासाठी सुरुवात केली आहे.
9 / 13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यामध्ये अशा दोन पंपांचे उद्घाटनही केले आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या इंजिनासाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
10 / 13
केवळ पेट्रोल किंवा डिझेल इंजिनच्या गाड्या देशात असणार नाहीत. यापुढे लोकांना वाहनांमध्ये फ्लेक्स फ्ल्यूएलचाही पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर देशातील वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्ल्यूएल इंजिन अनिवार्य होईल, असे गडकरींनी यापूर्वी म्हटले होते.
11 / 13
फ्लेक्स-फ्लूएल इंजिनमुळे वाहनचालकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल वापरण्याचा पर्याय वाहनामध्ये उपलब्ध होतो, असेही ते म्हणाले होते.
12 / 13
इथेनॉल किफायतशीर असून पर्यावरणपूरक तसेच देशांतर्गत उत्पादित होणारे इंधन आहे. यामुळे ग्राहकांची ३० ते ३५ रुपयांची बचत होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
13 / 13
आताच्या घडीला TVS आणि Bajaj या कंपन्यांना टू-व्हिलरमध्ये इथेनॉलवर चालणारे इंजिन विकसित करण्यात सांगण्यात आले आहे, असेही गडकरींनी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.
टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPetrolपेट्रोलDieselडिझेलbusinessव्यवसाय