By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:50 IST
1 / 9निफ्टी आयटीमधील सर्व १० कंपन्यांचे शेअर्स या वर्षात १० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. विशेष म्हणजे, यातील ६ दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये पहिल्या दोन महिन्यांतच २० टक्क्यांहून अधिक मोठी पडझड झाली आहे.2 / 9कोफोर्ज आणि विप्रोची दयनीय अवस्था : या वर्षात 'कोफोर्ज'चा शेअर २५ टक्क्यांनी घसरून सर्वात मागे राहिला आहे. त्यापाठोपाठ 'विप्रो'मध्ये २३.५ टक्क्यांची घसरण झाली असून, २०२२ नंतर कंपनीसाठी हे सर्वात कठीण वर्ष ठरताना दिसत आहे.3 / 9'पर्सिस्टंट सिस्टम्स' आणि 'एलटीआईमाइंडट्री' यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स २२-२३ टक्क्यांनी तुटले आहेत. देशातील दुसरी मोठी कंपनी 'इन्फोसिस'चा शेअर २० टक्क्यांनी घसरला असून हा २००८ नंतरचा त्यांचा सर्वात खराब काळ आहे.4 / 9आयटी क्षेत्रातील दिग्गज 'टीसीएस', 'एचसीएल टेक' आणि 'टेक महिंद्रा' या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी विक्री झाली आहे. या घसरणीमुळे आयटी क्षेत्राचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणावर घटले आहे.5 / 9परदेशी गुंतवणूकदारांची पाठ : आयटी क्षेत्रातील परदेशी गुंतवणूकदारांची हिस्सेदारी ४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. फक्त फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत या गुंतवणूकदारांनी आपली सुमारे १६% भागीदारी विकून बाहेर पडणे पसंत केले आहे.6 / 9चालू वर्ष २०२६ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी आयटी क्षेत्रातून तब्बल १२,८०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. सर्व क्षेत्रांच्या तुलनेत आयटीमधून झालेली ही सर्वाधिक विक्री असून यामुळे शेअर्सवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.7 / 9आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका : 'जेफरीज' या ब्रोकरेज फर्मने आयटी शेअर्सचे रेटिंग कमी केले आहे. एआयमुळे या क्षेत्राची रचना बदलू शकते आणि पारंपरिक 'मॅनेज्ड सर्व्हिसेस'चे काम कमी होऊन जोखीम वाढू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.8 / 9शेअर बाजारातील पडझड सुरू असली तरी अनेक विश्लेषकांनी 'बाय' रेटिंग दिले आहे. कोफोर्जमध्ये ५१% आणि इन्फोसिसमध्ये ३७% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, सध्याच्या घसरणीला खरेदीची संधी मानले जात आहे.9 / 9शेअर बाजारातील पडझड सुरू असली तरी अनेक विश्लेषकांनी 'बाय' रेटिंग दिले आहे. कोफोर्जमध्ये ५१% आणि इन्फोसिसमध्ये ३७% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, सध्याच्या घसरणीला खरेदीची संधी मानले जात आहे.