शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

JOBS: कोरोना संकटातही एप्रिल महिन्यात मोठी नोकरभरती; १२.७६ लाख नवे रोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 7:19 PM

1 / 10
गेल्या वर्षभरापासून देशावर असलेले कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले दिसत नाही. या संकटाच्या कालावधीत अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले. लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसल्याचे पाहायला मिळाले.
2 / 10
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचाही मोठा तडाखा देशाला बसला. या कालावधीत लाखो जण बेरोजगार झाले. मात्र, त्यानंतर हळूहळू आता पुन्हा एकदा उद्योगजगत, देश सावरताना दिसत आहे.
3 / 10
कोरोना संकटाच्या काळातही एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. नव्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत १३. ७३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
4 / 10
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२१ मध्ये नव्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत १२.७६ लाखांची इतकी वाढ झाली. तर, मार्च महिन्यात ११.२२ लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या.
5 / 10
केंद्रीय श्रम विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून, यानुसार, संघटित क्षेत्रात सध्या मोठी रोजगारनिर्मिती सुरु असल्याचे दिसत आहे. गेल्या आर्थिक वर्षात EPFO मध्ये एकूण ७७.०८ लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली होती.
6 / 10
गेल्यावर्षी हीच संख्या ७८.५८ लाख इतकी होती. मार्च २०२१ च्या तुलनेत एप्रिल महिन्यात पीएफ अकाऊंट बंद करणाऱ्यांचा आकडा ८७,८२१ ने कमी झाला. तर पीएफ अकाऊंट पुन्हा सुरु करणाऱ्यांची संख्या ९२,८६४ इतकी होती.
7 / 10
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात EPFO नोंदणी करणाऱ्यांमध्ये २,८४,५७६ इतकी घट झाली होती. देशव्यापी लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती ओढावली होती, असे सांगितले जाते.
8 / 10
कोरोना संकटामुळे कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO ने नोकरदारांसाठी अनेक महत्वाची पावले उचलली. कोरोनाच्या काळात ज्यांची नोकरी गेली आहे, जे लोक एका महिन्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार आहेत ते पीएफधारक आपल्या खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतात.
9 / 10
EPFO खाते आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार ईपीएफओ खात्याशी लिंक न केल्यास कंपन्यांना पीएफ खात्यात पैसे जमा करता येणार नाहीत.
10 / 10
एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडल्यानंतरही तो आपल्या ईपीएफओ खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकतो.
टॅग्स :jobनोकरी