शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:24 IST

1 / 6
पंजाब किंग्सने आयपीएल फायनलमध्ये धडक मारली होती. परंतू, सहा धावा कमी पडल्या आणि टीम हरली. आयपीएल सुरु झाल्यापासून प्रिती झिंटा या संघासाठी जातीने उपस्थित राहत होती. नेस वाडिया देखील आयपीएल ऑक्शनला दिसायचे. परंतू, संघाचा खरा मालक वेगळाच आहे, ज्याने आज शेअर बाजारात जाता जाता १५०० कोटी रुपयांचा मोठा हात मारला आहे.
2 / 6
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा नेहमीच पंजाब किंग्स इलेव्हनसाठी प्रत्येक मॅचला मैदानात हजर असते. यामुळे अनेकांना तीच मालक असल्याचे वाटते. परंतू, प्रत्यक्षात तसे नाहीय.
3 / 6
किंग्स इलेवन पंजाबमध्ये खरेतर अनेक लोकांचा हिस्सा आहे. नेस वाडिया, प्रिती झिंटा सह अनेकजण यात पैसे गुंतवून आहेत. यामध्ये एक असा बडा ग्रुप आहे ज्याची उत्पादने प्रत्येक भारतीय वापरतो. तो आहे डाबर ग्रुप. डाबर ग्रुपकडे पीबीकेएसचा ४८ टक्के हिस्सा आहे.
4 / 6
प्रितीची या संघात २३ टक्के हिस्सेदारी आहे, वाडियांकडे २३ आणि करण पॉल यांच्याकडे उर्वरित ६ टक्के हिस्सेदारी आहे. परंतू, डाबर ग्रुप जास्त प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. यामुळे या संघाला प्रिती प्रसिद्ध असल्याने तिचाच संघ म्हणून ओळखले जाते.
5 / 6
पंजाबने आयपीएलचा अंतिम सामना गमावला तरी देखील डाबरच्या शेअरनी चांगली कामगिरी केली आहे. आज कंपनीचे शेअर्स १.४५ टक्क्यांनी वाढून ४९२.५५ रुपयांवर बंद झाले.
6 / 6
डाबरने आज १४२८ कोटी रुपयांची कमाई केली. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसात ८६,११२.६५ कोटींवरून थेट ८७,५४०.४८ कोटी रुपये झाले आहे.
टॅग्स :IPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५Kings XI Punjabकिंग्स इलेव्हन पंजाबshare marketशेअर बाजार