शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ना ७० ना ९०.. 'या' कंपनीत फक्त ४० तास करावे लागते काम, सुविधा वाचून लगेच अर्ज करायला जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:13 IST

1 / 6
आठवड्यात कामाचे तास किती असावेत यावरुन भारतात चांगलच वाक् युद्ध पेटलं आहे. गेल्या वर्षी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. हा वाद शमण्याच्या आधी L&T कंपनीचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यन यांनी तर थेट ९० तास काम करण्याचे समर्थन केलं. अशा परिस्थिती तुम्हाला जर म्हटलं की एका कंपनीत कामाचे केवळ ४० तास आहेत. तर तुम्हाला विश्वास बसेल का?
2 / 6
या सॉस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त ४० तास काम करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे इतर कंपन्यांचे अध्यक्ष कामाचे तास वाढवण्याचे समर्थन करत असताना या अध्यक्षांनी आठवड्यातील कामाच्या तासांची मर्यादा ४० तास ठेवली आहे. 'वीबा' असे या कंपनीचे नाव आहे.
3 / 6
वीबा ही सॉस उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विराज बहल यांनी स्वतः कर्मचाऱ्यांचे कामाचे तास दर आठवड्याला ४० तासांपर्यंत कमी केले आहेत. कर्मचाऱ्यांकडून जास्त काम करुन घेणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
4 / 6
काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये विराज बहल म्हणाले की, कर्मचाऱ्यांना इतके काम करायला लावणे योग्य नाही. काम करायचे असेल तर त्यासाठी योग्य मानधन देणे गरजेचे आहे. कंपनीच्या संस्थापकांनी जास्त काम करणे ठीक आहे. पण कर्मचाऱ्यांकडून इतके काम करुन घेणे योग्य नाही.
5 / 6
इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी गेल्या वर्षी देशातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर L&T चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास करण्याचे समर्थन केलं. एखाद्याने रविवारीही काम करावे. किती वेळ घरात बसून बायकोकडे पाहणार, अशी कमेंटही त्यांनी केली होती.
6 / 6
या उद्योगपतींच्या वक्तव्यानंतर देशात वर्क लाईफ बॅलन्सबाबत चर्चांना वेग आला. लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याचा विरोध केला. या गंभीर प्रकरणाची चर्चा देशाच्या संसदेतही पोहोचली.
टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिसLabourकामगार