शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC मधील भागीदारी विकण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्जही मागवले

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 17, 2020 3:50 PM

1 / 8
भारतीय जीवन विमा महामंडळातील (एलआयसी) आपला वाटा विकण्यासाठी केंद्र सरकरा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
2 / 8
एलआयसीच्या मूल्यमापनासाठी मागवले अर्ज - अर्थमंत्रालयाने एलआयसीच्या मूल्यमापनासाठी अर्ज मागवले आहेत. यासंठी संबंधित कंपन्यांना 8 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
3 / 8
ही एक सामान्य प्रकारची मुल्यमापन पद्धत आहे. यात कंपनीची सध्याची संपत्ती आणि सध्या सुरू असलेल्या विमा पॉलिसिजमधून मिळणारा लाभ एकत्र केला जातो.
4 / 8
एलआयसीमधील आंशिक भागीदारी विकून ती शेअर बाजारात सूचीबद्ध कराण्याची सरकारची योजना आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्षातच ही विकण्याची सरकारची इच्छा आहे.
5 / 8
IPOच्या माध्यमाने विक्री - IPOच्या माध्यमाने याची विक्री होईल. यासाठी केंद्र सरकारने डेलॉयट आणि एसबीआय कॅपिटलला आयपीओपूर्वी व्यवहारासाठी सल्लागार नेमले आहे.
6 / 8
2.10 लाख कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य - सरकारने या आर्थिक वर्षात भागीदारी विक्रीतून 2.10 लाख कोटी रुपये जमविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यांपैकी 1.20 लाख कोटी रुपये केंद्रीय उपक्रमांत निर्गुंतवणूक करून जमवले जातील.
7 / 8
एअर इंडिया आणि बीपीसीएलदेखील रांगेत - जवळपास 90 हजार कोटी रुपये आर्थिक संस्थांतील भागीदारीच्या विक्रीतून येतील. ही रक्कम जमवण्यासाठी सरकार एलआयसी शिवाय, एअर इंडिया आणि बीपीसीएलमधील भागही विकण्याच्या तयारीत आहे.
8 / 8
एअर इंडिया आणि बीपीसीएलदेखील रांगेत - जवळपास 90 हजार कोटी रुपये आर्थिक संस्थांतील भागीदारीच्या विक्रीतून येतील. ही रक्कम जमवण्यासाठी सरकार एलआयसी शिवाय, एअर इंडिया आणि बीपीसीएलमधील भागही विकण्याच्या तयारीत आहे.