शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mutual Fund Investment Tips: १.८ कोटींचे छप्परफाड रिटर्न! केवळ ५ हजारांची गुंतवणूक करा; कोणता SIP निवडावा? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 1:39 PM

1 / 9
Mutual Fund Investment Tips: आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक अतिशय जोखमीची मानली जाते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा नसेल आणि कमी जोखमीची गुंतवणूक करायची असेल, तर म्युच्युअल फंडचा पर्याय चांगला ठरू शकतो, असे सांगितले जाते.
2 / 9
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP लोकांच्या पसंतीस उतरत आहे. याचे कारण म्हणजे लोकांना एसआयपीमध्ये कंपाउंडिंग लाभ मिळतो. तसेच भरपूर नफाही मिळतो. गेल्या काही वर्षांत SIP तून मिळालेल्या परताव्यामुळे यावर लोकांचा विश्वास खूप वाढला आहे. ज्यांना बाजारात थेट गुंतवणूक करायची नसेल, ते एसआयपीत पैसे गुंतवण्यास तयार आहेत.
3 / 9
सर्वोत्तम SIP निवडण्याआधी, तुम्ही SIP मध्ये कोणत्या उद्देशासाठी गुंतवणूक करू इच्छिता याचा विचार करणे आवश्यक आहे. सेवानिवृत्ती निधीसाठी, घराचे डाउन पेमेंट, प्रवासासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी एसआयपी करायचा आहे, ते ठरवणे उपयुक्त ठरू शकेल. तुमचे ध्येय काहीही असो, अल्प मुदतीची किंवा दीर्घ मुदतीची SIP निवडा, जेणेकरून तुम्हाला चांगले परतावा मिळू शकेल.
4 / 9
SIP निवडीसाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. तुमच्या गरजा समजून घेऊन आर्थिक सल्लागार तुम्हाला सर्वोत्तम SIP बाबत योग्य सूचना देऊ शकतात. म्युच्युअल फंड योजनांमध्ये फक्त १०० रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करून मोठा निधी उभा करू शकतात. म्युच्यूअल फंडात SIP द्वारे केल्यास तुम्हाला सुमारे १२ टक्के वार्षिक परतावा मिळतो.
5 / 9
तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा ५ हजार रुपयाची SIP सुरु केल्यास SIP कॅल्क्युलेटरनुसार १२% दराने तुम्ही २६ वर्षात १.१ कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता. सोप्या शब्दात बोलायचे तर २६ वर्षात पाच हजार रुपयाच्या गुंतवणुकीने तुमची एकूण गुंतवणूक रक्कम १५.६ लाख रुपये होईल.
6 / 9
तर तुम्हाला संपत्ती वाढ (वेल्थ गेन) म्हणून सुमारे ९५ लाख रुपये मिळतील. अशाप्रकारे २६ वर्षांत तुम्ही कोट्यवधींचे मालक बनाल. तुम्ही १० वर्षासाठी दरमहा पाच हजारांची SIP केल्यास तुम्हाला १२ टक्के दराने सुमारे ११.६ लाख रुपयांचा परतावा मिळेल, ज्यात गुंतवणुकीची मर्यादा ६ लाख रुपये असेल आणि परतावा ५.६ लाख रुपये असेल.
7 / 9
जर तुम्ही २० वर्षासाठी एकूण १२ लाखाची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला परतावा ५० लाखाचा मिळेल. तसेच ३० वर्षांच्या कालावधीत तुमची गुंतवणूक १८ लाख असल्यास तुम्हाला १.८ कोटींचा परतावा मिळेल. लक्षात घ्या की ही सर्व रक्कम एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार मोजली जाते.
8 / 9
शेअर बाजाराच्या चढ-उतारात अनेक लोक गुंतवणूक करणे टाळतात आणि पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी, बँक एफडी तसेच इतर अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूकीला पसंत करतात.
9 / 9
(टीप - या लेखात केवळ शेअरची / गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :Investmentगुंतवणूक