शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani यांचे तीन व्याही...तिघांकडे अफाट संपत्ती; तरीही अंबानींच्या खुप मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 3:34 PM

1 / 8
देशातील सर्वात मौल्यवान कंपनी Reliance Industries चे ​​चेअरमन आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेल्या Mukesh Ambani यांच्या घरात सनई चौघडे वाजणार आहेत. गुरुवारी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत 'रोका'(साखरपुटा) झाला. विशेष म्हणजे, मुकेश अंबानी यांना आता तीन व्याही झाले असून, तिघेही अफाट संपत्तीचे मालक आहेत. पण या तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे? जाणून घेऊ...
2 / 8
Isha Ambani ही पिरामल कुटुंबाची सून- मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिच्या खांद्यावर रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची मोठी जबाबदारी आहे. तिचे लग्न 12 डिसेंबर 2018 रोजी आनंद पिरामल यांच्यासोबत झाले आणि ईशा पिरामल कुटुंबाची सून झाली. अजय पिरामल यांच्या नेतृत्वाखालील पिरामल ग्रुप देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक आहे.
3 / 8
पिरामल ग्रुपचा व्यवसाय- मुकेश अंबानी यांचे व्याही आणि ईशा अंबानीचे सासरे Ajay Piramal हे देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक आहेत. त्यांची कंपनी पिरामल एंटरप्रायजेस ही फार्मा, हेल्थकेअर आणि फायनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित आहे. पिरामल ग्रुपच्या जगातील 30 देशांमध्ये शाखा आहेत. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी 1977 मध्ये कापड व्यवसायातून आपला व्यावसायिक प्रवास सुरू करणाऱ्या पिरामल यांनी फार्मा क्षेत्रात खास ओळख निर्माण केली आहे.
4 / 8
अजय पिरामल यांची संपत्ती- अजय पिरामल यांच्याशिवाय त्यांची पत्नी स्वाती पिरामल पिरामल बोर्डाच्या उपाध्यक्षा आहेत. याशिवाय मुलगी नंदिनी आणि मुलगा आनंद हेही बोर्डात आहेत. एकूण मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, अजय पिरामल यांची एकूण संपत्ती $3 अब्ज (सुमारे 24,825 कोटी रुपये) आहे.
5 / 8
आकाशचा विवाह 2019 मध्ये झाला- मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा Akash Ambaniच्या सासऱ्यांबद्दल बोलायचे तर, रिलायन्स जिओचे प्रभारी आकाश अंबानी यांचे श्लोका मेहतासोबत 9 मार्च 2019 रोजी लग्न झाले होते. श्लोका हिरे व्यापारी अरुण रसेल मेहता(Arun Russell Mehta) यांची मुलगी आहे. देशातील सुप्रसिद्ध हिरे व्यापार्‍यांमध्ये त्यांची गणना होते आणि जगातील अनेक देशांमध्ये त्यांचा व्यवसाय आहे.
6 / 8
रसेल मेहता यांची संपत्ती- अंबानी कुटुंबातील मोठी सून श्लोका मेहता यांचे वडील आणि मुकेश अंबानी यांचे व्याही रसेल मेहता रोझी ब्लू कंपनीचे एमडी आहेत. त्यांच्या कंपनीची गणना जगातील टॉप डायमंड कंपन्यांमध्ये केली जाते. भारतातील 26 शहरांमध्ये त्याची 36 पेक्षा जास्त दुकाने आहेत. याशिवाय आज ही कंपनी जगातील 12 देशांमध्ये हिऱ्यांचा व्यवसाय करते. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, अरुण रसेल मेहता यांची अंदाजे एकूण संपत्ती 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
7 / 8
वीरेन मर्चंट होणार अंबानींचे व्याही- मुकेश अंबानींच्या घरात एंट्री घेणारे राधिका मर्चंटचे वडील Viren Merchant यांच्याबद्दल बोलायचे तर तेही अब्जाधीशांच्या यादीत आहेत. वीरेन मर्चंट हे आरोग्य सेवा कंपनी Encore चे CEO आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 755 कोटी रुपये आहे. क्लासिकल डान्सर म्हणून ओळख निर्माण करणारी राधिका तिच्या वडिलांच्या व्यवसायातही मदत करते.
8 / 8
या सर्वांपेक्षा मुकेश अंबानी वरचड- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे श्रीमंतीमध्ये त्यांच्या व्याहींपेक्षा खूप पुढे आहेत. फोर्ब्सच्या मते, 90.1 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी हे जगातील आठव्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीbusinessव्यवसायmarriageलग्नInvestmentगुंतवणूक