Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:33 IST
1 / 8Post Office Investment: पोस्ट ऑफिसद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक आपले पैसे गुंतवून अत्यंत चांगला परतावा मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजना सरकारी असतात. 2 / 8या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर पैसे गमावण्याची कोणतीही भीती नसते आणि येथे गुंतवलेला पैसा सुरक्षित राहतो. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही दररोजच्या छोट्या छोट्या बचतीतून १७ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.3 / 8आम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी (RD) म्हणजेच 'रिकरिंग डिपॉझिट' योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेमध्ये तुम्ही दररोज ३३३ रुपयांच्या बचतीसह १७ लाख रुपयांचा फंड बनवू शकता. 4 / 8 पोस्ट ऑफिसच्या या रिकरिंग डिपॉझिट योजनेत लोक दरमहा गुंतवणूक करू शकतात आणि चांगला परतावा मिळवू शकतात. या योजनेत ६.७ टक्के व्याजदराने परतावा मिळतो.5 / 8तसंच, या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो, ज्यानंतर व्याजासह पूर्ण रक्कम मिळते. आरडी योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात दरमहा केवळ १०० रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करता येते.6 / 8जर तुम्ही दररोज ३३३ रुपयांची बचत केली, तर तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची बचत कराल. ही गुंतवणूक तुम्हाला १० वर्षांपर्यंत सुरू ठेवायची आहे. 7 / 8जर तुम्ही ही गुंतवणूक ५ वर्षांपर्यंत सुरू ठेवली, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ७.१३ लाख रुपये मिळतील. येथे तुमची एकूण गुंतवणूक ६ लाख रुपयांची असेल आणि तुम्हाला १.१३ लाख रुपयांचा व्याजाचा लाभ होईल.8 / 8१० वर्षांपर्यंत दरमहा १०,००० रुपये गुंतवल्यास तुम्ही एकूण १२ लाख रुपये गुंतवाल. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण १७.०८ लाख रुपयांचा निधी मिळेल. यामध्ये तुम्हाला ५.०८ लाख रुपये केवळ व्याजापोटी मिळतील.