शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मेस्सी'च्या देशात जगात सर्वाधिक महागाई, तरीही 24x7 विजयाचा जल्लोष सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 3:22 PM

1 / 7
संपूर्ण जग सध्या महागाई आणि वाढत्या व्याजदराच्या वाईट स्थितीतून जात आहे, परंतु एक असा देश आहे जिथे सर्वाधिक महागाई असूनही लोक आनंदोत्सवात मग्न आहेत. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनात विजयाचा जल्लोष सुरूच आहे.
2 / 7
अर्जेंटिनामधील महागाई आणि व्याजदर जगातील सर्वाधिक आहेत. मात्र, विजयाच्या आनंदाने लोकांना हे दु:ख विसरायला लावले आहे. अर्जेंटिना फुटबॉल संघासाठी 18 डिसेंबरचा दिवस ऐतिहासिक ठरला.
3 / 7
फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विश्वचषक जिंकला. या विजयानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या अर्जेंटिनामध्ये जल्लोषाचा एक जबरदस्त दिवस सुरू झाला. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या देशात सध्या जगात सर्वाधिक महागाई आहे.
4 / 7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के आहे आणि व्याजदर 75 टक्के आहे, जो खूप भीतीदायक आकडा आहे. अर्जेंटिना या 45 कोटी लोकसंख्येच्या देशात 40 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात.
5 / 7
येथील खाद्यपदार्थांची प्रचंड महागाई झाली आहे. अर्जेंटिनामधील महागाई 100 च्या आसपास आहे. म्हणजे आपल्या सध्याच्या महागाईच्या दरापेक्षा जवळपास 15 पट. म्हणजे एखादी वस्तू तेथे जर आधी 10 रुपयांना मिळत असेल तर तीच वस्तू 70-80 रुपयांच्या असपास विकत घ्यावी लागत आहे.
6 / 7
पिठाचा भाव 65 रुपये किलो आहे. गगनाला भिडणारी महागाई आणि वाढत्या व्याजदराची चिंता विसरून हा संपूर्ण देश फिफा विश्वचषक विजयाच्या जल्लोषात मग्न आहे आणि आपल्या स्टार फुटबॉलपटू मेस्सीचे मोकळ्या हातांनी स्वागत करत आहे.
7 / 7
विश्वचषकातील विजयानंतर अर्जेंटिनाच्या अनेक शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि आपला आनंद व्यक्त करत आहेत. या विजयाने ख्रिसमसच्या उत्सवाबाबत लोकांचा आनंदही द्विगुणित झाला आहे.
टॅग्स :Argentinaअर्जेंटिनाLionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉलInflationमहागाईbusinessव्यवसाय