By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 15:38 IST
1 / 6सध्या रिलायन्स जिओ या कंपनीकडे अनेक उत्तमोत्तम प्लॅन्स आहे. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आपल्या डेटाच्या गरजेनुसार प्लॅन्स निवडण्याची मुभाही आहे. 2 / 6परंतु रिलायन्स जिओचा मोठ्या कालावधीसाठी असलेल्या एक प्लॅन अतिशय खिशालाही परवडणारा आहे. यासाठी ग्राहकांना महिन्याला ७० रूपयांपेक्षाही कमी खर्च करावा लागतो. 3 / 6हा रिलायन्स जिओ फोनचा प्लान असून याची किंमत ७४९ रूपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३३६ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच हा प्लान ११ महिने चालतो. 4 / 6प्लानमध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचं बेनिफिटही घेऊ शकता. तसंच यासोबत एकूण २४ जीबी डेटा देण्यात येतो. या रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसांसाठी ५० एसएमएसचीही सुविधा देण्यात येते. याशिवाय जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन मिळतं.5 / 6रिलायन्स जिओच्या १८५ रूपयांच्या प्लॅनमध्ये बाय वन गेट वनचा फायदा मिळतो. म्हणजेच १८५ रूपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. परंतु ऑफर अंतर्गत ती ५६ दिवसांची मिळते. 6 / 6या प्लॅनमध्ये ग्राहकांना ११२ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदाही मिळतो. यासोबत १०० एसएमएस पाठवण्याची सुविधाही मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनही मिळतं.