जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:23 IST
1 / 7या तेजीचा थेट परिणाम जगातील अब्जाधीशांच्या निव्वळ संपत्तीवर झाला असून, ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सच्या टॉप-१० यादीत मोठा बदल झाला आहे. विशेष म्हणजे, गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.2 / 7जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत इलॉन मस्क अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे, इलॉन मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात १९.१ अब्ज डॉलर्सची जबरदस्त वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्सनुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती ४४१ अब्ज डॉलर आहे.3 / 7लॅरी पेज यांच्या संपत्तीत सोमवारी मोठी वाढ झाली. एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीत १४.९ अब्ज डॉलर्सचा वाढ झाली. त्यामुळे ते तिसऱ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांची एकूण संपत्ती २७२ अब्ज डॉलर इतकी आहे.4 / 7या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेज यांच्या पाठोपाठ लॅरी एलिसन (२५७ अब्ज डॉलर) तिसऱ्या क्रमांकावर आणि सर्गेई ब्रिन (२५४ अब्ज डॉलर) चौथ्या स्थानावर आहेत.5 / 7ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना एका स्थानाचे नुकसान झाले असून, ते चौथ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर गेले आहेत. त्यांची एकूण संपत्ती २४८ अब्ज डॉलर आहे.6 / 7सर्वात मोठा धक्का दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना बसला आहे. ते टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले आहेत, ज्यामुळे जागतिक आर्थिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.7 / 7एकंदरीत, टेक कंपन्यांच्या शेअर्समधील वाढीमुळे अब्जाधीशांच्या रँकिंगमध्ये मोठे बदल झाले आहेत, ज्याचे प्रमुख कारण लॅरी पेज यांची मोठी झेप आहे.