शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकदमच भारी! 'पीएफ'वरील व्याज खात्यात जमा झाल्याची आता घसबसल्या करा खात्री

By देवेश फडके | Published: January 10, 2021 6:32 PM

1 / 8
सन २०१९-२० या वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवर जाहीर केलेला व्याजाचा मोबदला पीएफ सभसदांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना आपल्या खात्यात व्याज जमा झाले की नाही, याबाबत साशंकता असते. मात्र, आता घरबसल्या आपण आपल्या पीएफ खात्याची माहिती घेऊ शकतो. त्यामुळे पीएफ व्याजाची रक्कम खात्यात आल्याची खातरजमा काही मिनिटांत करता येऊ शकणार आहे.
2 / 8
सन २०१९-२० या वर्षासाठी पीएफवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर करण्यात आला आहे. श्रम मंत्रालयाने पीएफ व्याज रक्कम सभासदांना देण्यात यावी, असा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला अर्थ खात्याने मंजुरी दिली असून, व्याजाची रक्कम पीएफ सभासदांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
3 / 8
सप्टेंबरमध्ये व्याजाची रक्कम दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामधील पहिला टप्प्यात ८.१५ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ०.३५ टक्के व्याज देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, श्रम मंत्रालयाने एकाच वेळी संपूर्ण ८.५ टक्के व्याजाची रक्कम सभासदांना देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यावर अर्थ खात्याने सहमती दर्शवली. यानंतर आता संपूर्ण ८.५ टक्के व्याजाची रक्कम पीएफ सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.
4 / 8
आपल्या पीएफ खात्यात पीएफ जमा झाला आहे की नाही याची खातरजमा पीएफ सभासदांना चार वेगवेगळ्या पर्यायांमधून करता येणार आहे. यात Umang App या सरकारी अॅपमधून पीएफ सभासदांना पीएफ व्याजबाबत माहिती घेता येईल.
5 / 8
Umang App मधून 'पीएफ' रक्कम तपासता येईल. स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरमधून Umang App डाउनलोड करावे. या अॅपवर तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर करा आणि अॅपमध्ये लॉगिन करा. अॅपमध्ये डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूमध्ये ‘Service Directory’ मध्ये जा. यामध्ये मध्ये EPFO या पर्यायाची निवड करा. यात View Passbook यावर क्लिक करून त्यात UAN नंबर आणि OTP सादर करून 'पीएफ'ची शिल्लक जाणून घेता येऊ शकेल.
6 / 8
SMS च्या माध्यमातूनही तुमची पीएफ शिल्लक जाणून घेता येऊ शकेल. या सेवेसाठी तुमचा UAN नंबर EPFO कडे रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. तुम्हांला ७७३८२९९८९९ या क्रमांकावर 'EPFOHO UAN ENG' हा संदेश पाठवावा लागेल. ही सेवा इंग्रजी, हिंदी, पंजाबी यांसारख्या १० विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे.
7 / 8
एका मिस्ड कॉलच्या आधारे पीएफ रक्कम माहिती करून घेता येऊ शकते. एसएमएस सेवेप्रमाणे सभासदांना मिस्ड कॉल देऊन पीएफचा बॅलन्स तपासता येईल. यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइलवरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. या सेवेसाठी UAN, PAN आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे.
8 / 8
यासह कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या epfindia.gov.in या वेबसाईटवर पीएफ शिल्लक रक्कम किती आहे, याची माहिती घेता येऊ शकते. या वेबसाईटवर passbook.epfindia.gov.in या एक नवीन पेजवर तुम्हांला संबंधित माहिती सादर करावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला UAN क्रमांक, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर आणखी एक नवीन पेज उघडेल. यात तुम्हाला मेंबर आयडीची निवड करावी लागेल. यानंतर 'ई-पासबुक'मधून तुम्हाला खात्यात पीएफ शिल्लक रक्कम किती आहे, याबाबतची माहिती मिळू शकेल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीsmsएसएमएसMobileमोबाइलonlineऑनलाइन