Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:28 IST
1 / 9या जगात नवीन नोकऱ्या उत्पन्न करण्याचे देशोदेशीच्या सरकारसमोर मोठे आव्हान असताना आता आहेत त्या नोकऱ्या देखील संपुष्टात येणार आहेत. एकीकडे युद्धखोरी, तणाव आणि व्यापारयुद्ध यामुळे जागतिक मंदीचा फटका मोठमोठ्या कंपन्यांना बसत आहे. त्यातच एआय लाखो नोकऱ्या गिळंकृत करत आहे. 2 / 9एआय नावाच्या भस्मासुराने त्याला जन्म घातलेल्याच आयटी तज्ञांच्या नोकऱ्या खाऊन टाकल्या आहेत. या भयाच्या छायेखाली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या पाच नोकऱ्या संपणार असल्याचे म्हटले आहे. 3 / 9ऑटो इंडस्ट्रीत नोकरकपात आहे, मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या कंपनीने सहा-सात हजार लोकांना काढले आहे. अशा बातम्या येत आहेत. अशातच बऱ्याच नोकऱ्या अशा आहेत ज्यांच्या बातम्या होणार नाहीत परंतू त्यांच्या नोकऱ्या एआय किंवा ऑटोमेशनने जाणार आहेत. 4 / 9वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५ जारी केला आहे. यानुसार गेल्या काही वर्षांपासून समाजासाठी सर्वात महत्वाच्या म्हटल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत. २०३० पर्यंत जगात १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. परंतू याच काळात ९ कोटींहून अधिकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. 5 / 9पोस्टल सर्व्हिस क्लर्क ही नोकरी सर्वाधित वेगाने संपुष्टात येऊ लागली आहे. डिजिटल कम्युनिकेशन, ऑनलाइन बिलिंग आणि ई-गव्हर्नन्सच्या वापरामुळे नोकऱ्या कमी होऊ लागल्या आहेत. २०३० पर्यंत या नोकरीत २६ टक्क्यांची कपात होणार आहे. 6 / 9सध्या बँकांतील कारकुनगिरी धोक्यात आली आहे. क्लार्क, कॅशिअरसारख्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. डिजिटल बँकिंगमुळे शाखांमध्ये अनेक प्रकारच्या नोकऱ्या कमी झाल्या आहेत. प्रत्येक कंपनीला बँक टेलरची आवश्यकता होती, परंतु आता त्यांची जागा मोबाईल अॅप्लिकेशन्स, ऑटोमेटेड किओस्क आणि एआय ग्राहक सेवा प्लॅटफॉर्म घेत आहे, यामुळे या नोकऱ्या २०३० पर्यंत संपणार आहेत. 7 / 9ऑटोमेशनमुळे अनेक कंपन्यांमध्ये क्लार्कची पोस्ट संपुष्टात येत आहे. प्रगत तंत्रज्ञान डेटा एंट्रीच नाही तर डेटा तुम्हाला काढूनही देत आहे. २०३० पर्यंत डेटा एंट्री क्लर्कची नोकरी २४% ने कमी होईल.8 / 9रेल्वे, मेट्रो अशा ठिकाणी तिकीट काढणारे देखील आता दिसणार नाहीत. त्याच्याजागी आता टिकिट व्हेंडिंग मशीन आले आहेत. मेट्रोत तर तुम्हाला तिकीटच काढायला कोणी नसतो. अॅप, डिजिटल पेमेंट करून तुम्हालाच तुमचे तिकीट काढावे लागत आहे. यामुळे कॅशिअरची देखील नोकरी संपली आहे. 9 / 9अनेकांना पीएसारखा व्यक्ती सोबत, हाताखाली लागत होता. त्याला असिस्टंट म्हटले जायचे. जो छोटी छोटी कामे करत होता. जसे की वेळापत्रक तयार करणे, नियोजन करणे या गोष्टी आता मशीनने होऊ लागल्या आहेत. यामुळे हे असिस्टंटचे जॉबही येत्या पाच वर्षांत संपणार आहेत.