शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आधी विरोध केला आता एकत्र आले; Jio आणि Airtel साठी Starlink का महत्वाचे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 21:17 IST

1 / 10
Airtel-Jio Starlink Deal: भारताच्या डिजिटल इकोसिस्टममध्ये मोठा बदल होणार आहे. रिलायन्स JIO प्लॅटफॉर्म्सने भारतात Starlink सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी इलॉन मस्कची कंपनी SpaceX सोबत हातमिळवणी केली आहे. याशिवाय Airtel नेदेखील मंगळवारी स्टारलिंकसोबत करार केला. आता प्रश्न असा पडतो की, भारतात ज्या दोन कंपन्या एकेकाळी स्टारलिंकला विरोध करत होत्या, त्या आता त्यासोबत व्यवसाय करण्यासाठी पुढे का येत आहेत?
2 / 10
स्टारलिंक ऑक्टोबर 2022 पासून भारतीय बाजारपेठेत शिरण्याचा प्रयत्न करत होती. पण, जिओ आणि एअरटेलसारख्या दूरसंचार दिग्गजांनी सुरुवातीला विरोध केला. भारत सरकारने सॅटेलाईठ ब्रॉडबँड सेवांसाठी स्पेक्ट्रम वाटप करण्याचा निर्णय घेतला होता, ज्याबद्दल जिओ आणि एअरटेलची मते भिन्न होती. जिओने स्पेक्ट्रम वाटपासाठी लिलावाची बाजू मांडली होती.
3 / 10
तर 2024 मध्ये एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल म्हणाले होते की, सॅटेलाइट कंपन्यांनी स्पेक्ट्रम विकत घ्यावे आणि टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे परवाना शुल्क भरावे. जिओनेही याला पाठिंबा दिला होता. यावर इलॉन मस्क म्हणाले होते की, स्टारलिंकला भारतात काम करण्याची परवानगी मिळणे खूप कठीण आहे.
4 / 10
सुरुवातीच्या विरोधानंतर जिओ आणि एअरटेल, या दोघांनी आता स्टारलिंकसोबत भागीदारी केली आहे. Jio ची घोषणा Airtel नंतर आली आहे. हे पाऊल सॅटेलाइट इंटरनेटच्या क्षेत्रात दोन टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेचे संकेत देते.
5 / 10
SpaceX सह Jio आणि Airtel चा हा करार भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागात हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवा प्रदान करण्यात मदत करेल. डेटा ट्रॅफिकच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा मोबाइल ऑपरेटर जिओ आणि लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट तंत्रज्ञानामध्ये माहिर असलेल्या स्टारलिंकची भागीदारी भारताच्या डिजिटल इकोसिस्टमला आणखी मजबूत करेल.
6 / 10
एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी ही भागीदारी एक मोठा मैलाचा दगड असल्याचे वर्णन केले आहे. या करारामुळे एअरटेल आणि स्पेसएक्सला भारतीय बाजारपेठेत नवीन शक्यता शोधण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
7 / 10
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर आणि इलॉन मस्क यांच्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. यावरून हे स्पष्ट होते की, भारत सरकारही देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवेला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे.
8 / 10
आता सर्वांच्या नजरा SpaceX वर आहेत, जो भारत सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहे. एकदा परवानगी मिळाल्यानंतर, स्टारलिंक भारतात आपली सेवा सुरू करू शकते. यामुळे केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही हायस्पीड इंटरनेटचा वापर वाढेल.
9 / 10
सॅटेलाइट इंटरनेट तीन गोष्टींवर आधारित आहे. सॅटेलाईट, ग्राउंड स्टेशन आणि युजर डिव्हाईस. सॅटेलाईठ हा या इंटरनेट प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. हे सॅटेलाईठ पृथ्वीच्या कक्षेत उपस्थित असतात आणि तुमच्या डिव्हाइसवर डेटा हस्तांतरित करतात.
10 / 10
पूर्वी जिओस्टेशनरी ऑर्बिट (GEO) मध्ये काम करण्यासाठी जुन्या सिस्टीम वापरल्या जात होत्या, परंतु Starlink आणि Quiper सारख्या नवीन तंत्रज्ञान लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये काम करत आहेत, ज्यामुळे इंटरनेटचा वेग वाढतो आणि विलंब कमी होतो.
टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलelon muskएलन रीव्ह मस्कtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसायIndiaभारत