शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Home Loan EMI: गृहकर्जाचा हप्ता ओझे ठरतोय? हे ५ मार्ग अवलंबा, EMI कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 8:48 AM

1 / 7
गेल्या काही महिन्यांपासून रिअल इस्टेट बाजारात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. कोरोनामुळे आलेली सुस्ती झटकून आता बँकाही होम लोनवर कमी व्याजदर देत आहेत. यामुळे लोकांनी पैसे वाचतात म्हणून या संधीचा फायदा घेत घरे घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला हे जरी चांगले वाटत असले तरी नंतर घराचा ईएमआय एक ओझे वाटू लागतो.
2 / 7
आज आम्ही तुम्हाला काही असे मार्ग सांगणार आहोत, की तुम्हाला EMI वरील भार हलका होण्यास मदत मिळणार आहे.
3 / 7
जर तुम्ही प्री पेमेंटचा पर्याय निवडला तर खूप लवकर तुम्ही कर्ज संपवू शकता. यामुळे तुम्हाला व्याजावर जे पैसे जाणार होते, ते वाचतील. यासाठी तुम्हाला तुम्ही सेव्ह केलेले पैसे कर्जामध्ये भरावे लागणार आहेत. एनबीएफसी फ्लोटिंग रेटवर होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना प्रीपेमेंट केल्यास कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही.
4 / 7
जर तुम्ही A बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि तुम्हाला दिसले की बी बँक तुम्हाला आकर्षक व्याजदरावर गृहकर्ज देत आहे, तर तुम्ही बी बँकेत तुमचे गृह कर्ज शिल्लक हस्तांतरण करू शकता. तथापि, हा शेवटचा पर्याय असावा कारण बॅलंस ट्रान्सफरसाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाते.
5 / 7
अनेक बँका अशा आहेत, ज्या वार्षिक आधारावर होम लोन इन्स्टॉलमेंट रिव्हिजन करण्याचा पर्याय देतात. जर तुम्ही अलीकडे नोकरी बदलली असेल आणि तुमचा पगार मागील कंपनीपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जास्त EMI भरण्याच्या स्थितीत असाल तर तुम्ही तुमचा EMI वाढवावा. याद्वारे तुम्ही कर्जाचा कालावधी कमी करू शकाल.
6 / 7
कर्जाची एकूण किंमत तुम्ही किती वर्षे कर्ज घेत आहात यावर अवलंबून असेल. एकीकडे 25 ते 30 वर्षांच्या कर्जामुळे तुमचे मासिक हप्ते कमी होतात आणि तुम्ही अधिक कर्ज घेऊ शकता. दुसरीकडे, जर तुम्ही 10-15 वर्षांचे कर्ज घेतले तर तुम्ही कमी व्याज द्याल आणि तुमचे कर्ज लवकर संपेल.
7 / 7
बहुतेक बँका मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या 75-90 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. अशा परिस्थितीत तुम्ही 10-25 टक्के भरून घर खरेदी करू शकता. तथापि, जर तुमच्याकडे बचत असेल तर तुम्ही किमान रकमेचे कर्ज घ्यावे. यामुळे तुमच्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनbankबँक