शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

विमानं ठप्प, तेल महागलं! युद्धामुळे जागतिक अर्थकारण धोक्यात; गुंतवणूकदारांकडे कोणते पर्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:39 IST

1 / 9
जगातील सुमारे २० टक्के तेल पुरवठा ज्या 'होर्मुझ' सामुद्रधुनीतून होतो, तो मार्ग सलग चौथ्या दिवशी बंद आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
2 / 9
युद्धाच्या आगीमुळे दुबई आणि दोहा यांसारख्या प्रमुख शहरांमधील विमानतळांवरील कामकाज ठप्प झाले आहे. कतार एअरवेज, अमिरात आणि एतिहाद यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या अनेक उड्डाणे स्थगित केल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे.
3 / 9
जागतिक गुंतवणूक बँक 'UBS' च्या मते, ऊर्जेच्या पुरवठ्यात आलेला हा अडथळा केवळ तात्पुरता असेल. जोपर्यंत तेलाच्या मुख्य पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होत नाही, तोपर्यंत वाढलेले दर काही दिवसांनी पुन्हा स्थिर होऊ शकतात.
4 / 9
ऐतिहासिक आकडेवारीनुसार, भू-राजकीय संकटांचा बाजारावर होणारा परिणाम मर्यादित काळासाठीच असतो. त्यामुळे घाईघाईने पोर्टफोलिओमधील जोखीम कमी करण्यापेक्षा किंवा शेअर्स विकण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी शांत राहून दीर्घकालीन विचार करणे फायदेशीर ठरेल.
5 / 9
लष्करी तणावामुळे सुरुवातीला बाजार दबावाखाली राहू शकतो, परंतु २०२६ च्या अखेरीस बाजारात १० टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. अमेरिकेची मजबूत अर्थव्यवस्था आणि कंपन्यांची चांगली कमाई यामुळे जागतिक बाजारात पुन्हा एकदा तेजी येईल.
6 / 9
आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे देश महत्त्वाची भूमिका बजावतील. विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्र आणि उदयोन्मुख बाजारपेठांमधून मोठ्या प्रमाणात परतावा मिळण्याची शक्यता आहे.
7 / 9
पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी एकूण मालमत्तेच्या काही हिस्सा सोन्यात गुंतवणे फायदेशीर ठरेल. पश्चिम आशियातील बदलती परिस्थिती पाहता, कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याची गुंतवणूक एक 'हेल्पिंग हॅन्ड' म्हणून काम करू शकते.
8 / 9
जर तेलाचे दर दीर्घकाळ चढे राहिले, तर महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत केंद्रीय बँका व्याजदर वाढवण्याचा विचार करू शकतात, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर आणि कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होऊ शकतो.
9 / 9
कच्च्या तेलाच्या किमतीतील तात्पुरत्या वाढीमुळे जागतिक आर्थिक विकासावर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. तेल आयात करणाऱ्या देशांना थोडा काळ झळ बसली तरी, बाजार स्वतःला पुन्हा संतुलित करून काही वर्षांत पूर्वपदावर येईल.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketस्टॉक मार्केटCrude Oilखनिज तेलIranइराणIsraelइस्रायल