शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्धा झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:25 IST

1 / 9
प्राज इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये आज (१२ ऑगस्ट) ९% ची मोठी घसरण दिसून आली आहे. कंपनीच्या जून तिमाहीतील निराशाजनक निकालांनंतर ही घसरण दिसत आहे. याच बरोबर कंपनीचा शेअर, या वर्षी १ जानेवारीच्या शिखरावरून (₹ ८७५) थेट निम्म्यावर अथवा अर्ध्यावर आला आहे.
2 / 9
हा शेअर सध्या ४१४ रुपयांवर व्यवहार करत आहे. जो गेल्या महिन्याच्या तुलनेत १६% ने खाली आला आहे. जर अशीच स्थिती वर्षाच्या अखेरपर्यंत राहिली तर, २०१९ नंतर, शेअर नकारात्मक परतावा देईल, असे पहिल्यांदाच घडेल.
3 / 9
आर्थिक स्थिती बिघडली - जून तिमाहीत प्राज इंडस्ट्रीजचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ८% ने घसरून ₹ ६४०.२ कोटी झाला. तर नफा (EBITDA) गेल्या वर्षीच्या तुलनेत ६६% ने कमी झाला आहे. नफ्याचा दरही (EBITDA मार्जिन) केवळ ४.९% एवढाच राहिला, गेल्या वर्षी तो १३.२% होता.
4 / 9
सर्वात मोठा धक्का निव्वळ नफ्यात बसला, जो ९४% ने घसरून केवळ ₹५.३३ कोटी राहिला. तथापि, ही घसरण काहीशी अधिक दिसते. कारण गेल्या वर्षी कंपनीने नसरापूरमधील जमीन विकून ₹२८.१५ कोटींचा विशेष नफा मिळवला होता.
5 / 9
कंपनीने म्हटले आहे की, तिच्या देशांतर्गत इथेनॉल व्यवसायात ग्राहकांकडे पैशांची कमतरता आणि कामास विलंब होत आहे. याच बरोबर, कंडलामध्ये काही मोठ्या अभियांत्रिकी ऑर्डर्स पूर्ण होण्यास विलंब झाल्यामुळे वेतन आणि मूलभूत खर्चात वाढ झाली.
6 / 9
याशिवाय, कंपनीला या तिमाहीत नव्या ऑर्डर्स देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत 10.5% ने कमी मिळाल्या. तथापि, जुन्या ऑर्डरचा बॅकलॉग १०% ने वाढून ₹४,४४८ कोटी झाला आहे.
7 / 9
तज्ज्ञ देतायत शेअर खरेदीचा सल्ला - विशेष म्हणजे, प्राज इंडस्ट्रीजवर लक्ष ठेऊन असलेल्या नऊ तज्ज्ञांपैकी ८ जण अजूनही स्टॉक 'खरेदी'चा सल्ला देत आहेत. तर एकाने 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला आहे.
8 / 9
गेल्या काही वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 2020 मध्ये 12.6%, 2021 मध्ये 190%, 2022 मध्ये 6.3%, 2023 मध्ये 56% तर गेल्या वर्षी 48% एवढा परतावा या शेअरने दिला. मात्र, या वर्षीच्या घसरणीने गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढवले आहे.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketस्टॉक मार्केट