Mukesh Ambani: उद्योगपती मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार २४ लाख, पण द्यावी लागते ‘ही’ कठीण परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 08:06 AM2021-04-01T08:06:17+5:302021-04-01T08:10:00+5:30

Mukesh Ambani Drivers Salary: उद्योगपती मुकेश अंबानी जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत, यांच्याकडे अब्जावधीची संपत्ती आहे, अंबानी यांच्या घरी ६०० पेक्षा अधिक कर्मचारी कामाला आहेत, यातील अनेकांना लाखो रुपये पगार दिला जातो.

मुकेश अंबानी भारतातच नाही तर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या यादीत गणले जातात. अब्जावधीचे मालक असलेले मुकेश अंबानी त्याच्या उद्योगासारखेच राहणीमानासाठीही चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांचे एँटेलिया या महागड्या घरात राहतात. २८ मजली घरात जवळपास ६०० नोकर काम करतात.

एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणाऱ्यांचा पगार १० हजार ते २ लाखांपर्यंत प्रतिमहिना आहे. त्याचसोबत अंबानी कुटुंब कर्मचाऱ्यांना पगारासोबतच इन्श्यूरन्स आणि एज्युकेशन भत्ताही दिला जातो.

मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणाऱ्या काही नोकरांची मुलं ही अमेरिकेत उच्चशिक्षण घेत आहेत हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुकेश अंबानी यांच्या गाडीच्या चालकाला महिन्याला २ लाख रुपये पगार दिला जातो.

परंतु मुकेश अंबानी यांच्या गाडीवर ड्रायव्हर बनणे इतके सोप्पे नाही, त्यासाठी चालकाला अनेक कठीण परीक्षेतून जावं लागतं. अंबानी यांचा ड्रायव्हर बनण्यासाठी विविध कंपन्यांना कंत्राट दिलं जातं. त्यासाठी निविदाही काढल्या जातात.

मुकेश अंबानी यांच्याकडे तब्बल ५०० हून अधिक गाड्या आहेत. या गाड्या चालवण्यासाठी अनेक ड्रायव्हर्स ठेवले जातात. निवडलेल्या कंपन्या ड्रायव्हर पदासाठी व्हेकेन्सी काढतात.

यानंतर चाचणी घेतली जाते, त्यातून ठराविक उमेदवारांना निवडलं जातं, त्यानंतर या उमेदवारांची अंतिम चाचणी होते, जे उमेदवार पात्र ठरतात, अशांना कंपनीकडून ट्रेनिंग दिलं जातं.

ट्रेनिंगनंतर उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांचा पगार ठरवला जातो. साधारणपणे एका गाडी चालकाला २ लाख किंवा त्याहून अधिक पगार दिला जातो. परंतु अंबानी यांच्याकडे ड्रायव्हर ठेवण्यापूर्वी एका गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं जातं.

गाडी चालकाला सर्वप्रकारे गाडी चालवता आली पाहिजे, त्यांना अनेक वर्षाचा अनुभव हवा. त्याचसोबत गाडी चालकाचा स्वभाव आणि इतरांसोबत बोलणं चांगले पाहिजे. कारण ड्रायव्हरवर मीडिया आणि अन्य मोठ्या व्यक्तींचा प्रेशर असतो.

गाडी ड्रायव्हर बनण्यापूर्वी त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते. मुकेश अंबानी यांच्या लग्झरी गाड्यांसह अनेक हॅलिकॉप्टरही आहेत. ड्रायव्हरला पगाराव्यतिरिक्त राहणे, खाण्याची सुविधाही दिली जाते.

इतकचं नाही तर मुकेश अंबानी यांच्या घरी जेवण बनवणाऱ्यालाही लाखोंच्या घरात पगार आहे, मुकेश अंबानी कुटुंब खाण्याचे शौकीन आहेत, त्यामुळे याठिकाणी शेफलाही विविध प्रकारचं जेवणं बनवावं लागतं.

Read in English