शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अन्न, प्रवास, शिक्षण की आरोग्य.. भारतीय सर्वाधिक खर्च कुठे करतात? कोणत्या खर्चात केली कपात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:07 IST

1 / 7
काळाप्रमाणे अनेक गोष्टी बदलत जातात. पूर्वीच्या काळी दोनतीन हजारात महिन्याचा खर्च भागत होता. आता महिन्याचे वीसतीस हजारही पूरत नाही. महागाईसोबत बदलती जीवनशैली अशा अनेक गोष्टी यामागे आहेत.
2 / 7
गेल्या १० वर्षांत भारतीयांनी त्यांच्या खर्चाच्या सवयींमध्ये केलेले बदल धक्कादायक आहेत. २०१३ ते २०२३ पर्यंत, भारतीयांनी आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रांवर अधिक खर्च केला आहे, तर याआधी भारतीयांनी अन्न, कपडे आणि घरावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स २०२४ च्या डेटानुसार ट्रेंडने केलेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे.
3 / 7
गेल्या 10 वर्षात भारतीय ग्राहकांचे लक्ष अन्न आणि कपड्यांपेक्षा सेवांकडे जास्त आहे. नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स २०२४ च्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत भारतीय ग्राहक अन्न, वस्त्र आणि घराऐवजी सेवांवर त्यांचा खर्च वाढवत आहेत.
4 / 7
खासगी अंतिम उपभोग खर्चामध्ये (PFCE) जीवनावश्यक वस्तूंचा वाटा आर्थिक वर्ष २०१३ आणि आर्थिक वर्ष २०२३ दरम्यान घसरला आहे, तर आरोग्यसेवा आणि शिक्षणासह इतरांचा वाटा वाढला आहे.
5 / 7
१० वर्षात आरोग्यावरील खर्चात ८.२ टक्के वाढ झाली असून शिक्षणावर ७.५ टक्के वाढ झाली आहे. या आधारावर, गेल्या १० वर्षांत खाजगी अंतिम उपभोग खर्चामध्ये (PFCE) एकूण सरासरी ६ टक्के वाढ दिसून आली आहे.
6 / 7
घरगुती खर्च १६.४ टक्क्यांवरून १३ टक्के आणि कपड्यांवरील खर्च ६.१ टक्क्यांवरून ४.८ टक्क्यांवर आला आहे. वाहतूक क्षेत्रात ८.२ टक्के वाढ दिसून आली आहे. तर कम्युनिकेशन खर्चात ७.८ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
7 / 7
जर आपण टॉप ३ खर्च क्षेत्रांवर नजर टाकली तर, २७.८ टक्के खर्च खाणेपिण्यावर होतो आहे, ९.३ टक्के वाहतूक सेवांमध्ये, ९.२ टक्के घर भाडे, ६.८ टक्के खासगी वाहतूक ऑपरेशनमध्ये आणि ६.३ टक्के धान्य खर्चात नोंदवला गेला आहे. .
टॅग्स :consumerग्राहकMONEYपैसाfoodअन्नHealthआरोग्यEducationशिक्षण