Income Tax Calculation: १५,२० आणि २५ लाखांच्या कमाईवर किती लागेल टॅक्स? फक्त २ मिनिटांत समजून घ्या हे गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 09:29 IST
1 / 7Income Tax Calculation: १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसंच यावेळी त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल अशी घोषणाही केली. नव्या करप्रणालीअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतकरमुक्त केल्यानंतर आणि नवे टॅक्स स्लॅब आणल्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना किती कर भरावा लागेल, हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे. आपण आज त्याचं गणित जाणून घेण्याचा प्रयत्न करू.2 / 7मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत सरकारनं १२ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचं उत्पन्न करमुक्त केलं आहे. म्हणजेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना कर भरावा लागणार नाही. मात्र, यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास इन्कम टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागणार आहे.3 / 7४ ते ८ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के, ८ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १० टक्के, १२ ते १६ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के, १६ ते २० लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के आणि २० ते २४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर २५ टक्के कर आकारला जाईल. तसंच २४ लाख रुपयांच्या कमाईवर ३० टक्के कर लागणार आहे.4 / 7आज आपण सोप्या शब्दात जाणून घेऊ की तुम्हाला १५ लाख, २० लाख आणि २५ लाख रुपयांवर किती कर लागू शकतो. जर तुमची कमाई १२ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर किती कर लागेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.5 / 7१५ लाखांवर किती कर? नव्या कर प्रणाली अंतर्गत इन्कम टॅक्स सूट मर्यादा १२ लाख रुपये आहे. त्यामुळे १५ लाखांवर टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्सची गणना केली जाईल. यात स्टँडर्ड डिडक्शनचा ७५ हजारांचा फायदा मिळेल. म्हणजेच १५०००००-७५०००= १४,२५०००. ४-८ लाखांवर ५ टक्क्यांनुसार ४० हजार, ८-१२ लाखांवर १० टक्क्यांनुसार ४० हजार आणि १२ ते १६ लाखावर १५ टक्क्यानुसार ३३,७५० रुपये टॅक्स लागेल. यानुसार एकूण कर ९३,७५० रुपये लागेल. यावर ४ टक्के सेसनुसार ३,७५० रुपये लागतील. नव्या स्लॅबनुसार एकूण ९७,५०० रुपयांचा कर द्यावा लागेल.6 / 7२० लाखांवर किती कर? २० लाखांवर टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्सची गणना केली जाईल. यात स्टँडर्ड डिडक्शनचा ७५ हजारांचा फायदा मिळेल. म्हणजेच २००००००-७५०००= १९,२५०००. ४-८ लाखांवर ५ टक्क्यांनुसार २० हजार, ८-१२ लाखांवर १० टक्क्यांनुसार ४० हजार आणि १२ ते १६ लाखावर १५ टक्क्यानुसार ६०,००० रुपये टॅक्स लागेल. तर १६ ते २० लाखांवर ६५ हजार रुपये कर लागेल. यानुसार एकूण कर १,८५,००० रुपये असेल. यावर ४ टक्के सेसनुसार ७,४०० रुपये लागतील. नव्या स्लॅबनुसार एकूण १,९२,४०० रुपयांचा कर द्यावा लागेल.7 / 7२५ लाखांवर किती टॅक्स? नव्या कर प्रणाली अंतर्गत इन्कम टॅक्स सूट मर्यादा १२ लाख रुपये आहे. त्यामुळे २५ लाखांवरही टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्सची गणना केली जाईल. यात स्टँडर्ड डिडक्शनचा ७५ हजारांचा फायदा मिळेल. म्हणजेच २५०००००-७५०००= २४,२५०००. ४-८ लाखांवर ५ टक्क्यांनुसार २० हजार, ८-१२ लाखांवर १० टक्क्यांनुसार ४० हजार आणि १२ ते १६ लाखावर १५ टक्क्यानुसार ६० हजार रुपये टॅक्स लागेल. १६ ते २० लाखांवर ८० हजार रुपये, २० ते २४ लाखांवर १ लाख रुपये आणि २४ लाखांपेक्षा अधिक रकमेवर ७,५०० रुपये टॅक्स लागेल. यानुसार एकूण कर ३ लाख ७ हजार ५०० रुपये असेल. यावर ४ टक्के सेस नुसार १२,३०० रुपये भरावे लागले, त्यानंतर नव्या स्लॅबनुसार एकूण ३,१९,८०० रुपयांचा कर द्यावा लागेल.