Aadhaar Pan Link : आधार - पॅन कार्ड लिंक केले नसेल तर?, पाहा काय आहे पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 08:14 AM2022-07-16T08:14:07+5:302022-07-16T08:19:25+5:30

भारतीय नागरिकांची ओळख असलेले आधार कार्ड आणि आयकर विभागाने वितरीत केलेले पॅन कार्ड ( पर्मनंट अकाउंट नंबर) परस्परांशी लिंक करणे आयकर विभागाने अनिवार्य केलेले आहे.

भारतीय नागरिकांची ओळख असलेले आधार कार्ड आणि आयकर विभागाने वितरीत केलेले पॅन कार्ड ( पर्मनंट अकाउंट नंबर) परस्परांशी लिंक करणे आयकर विभागाने अनिवार्य केलेले आहे.

आयकर विवरण पत्र भरण्याबरोबरच इतरही अनेक कारणांसाठी आधार आणि पॅन कार्डाचे हे लिंकिंग अनिवार्य आहे. त्याकरता अनेक मुदतवाढी देण्यात आल्या. ज्यांनी अजूनही हे लिंकिंग केले नसेल, त्यांना आता विलंब शुल्क भरून ३१ मार्च २०२३ च्या आत हे काम करता येऊ शकेल. त्यानंतरही आधारशी लिंक न झालेली पॅनकार्ड आपोआप रद्द होतील.

आसाम, जम्मू आणि काश्मीर तसेच मेघालयाचे रहिवासी, अनिवासी भारतीय आणि ८० वर्षे वयावरील व्यक्ती यांना या लिंकिंग मधून सूट देण्यात आलेली आहे. आयकर विभागाच्या इ-फायलिंग पोर्टलवर जाऊन (तुम्ही तिथे रजिस्टर्ड नसलात तरीही) हे लिंकिंग करता येऊ शकते.

या पोर्टलच्या होमपेजवर त्यासाठीची लिंक दिलेली आहे. या लिंकिंगसाठीचे विलंब शुल्क ( सध्या १००० रुपये) NSDL च्या वेबसाईटवर जाऊन भरावे लागेल.

तिथे हे विलंब शुल्क भरल्यावर आयकर विभागाच्या इ फायलिंग पोर्टलवर जाऊन पुढली प्रक्रिया करण्यासाठी किमान चार दिवस थांबावे ( कारण विलंब शुल्क भरल्याची नोंद त्याठिकाणी रिफ्लेक्ट होण्याला काही अवधी लागू शकतो) आधार आणि पॅनकार्डावरील तुमचे व्यक्तिगत तपशील (नाव, जन्मतारीख, पत्ता , मोबाईल नंबर) परस्परांशी जुळत नसले, तर हे लिंकिंग होणार नाही. त्याकरता चुकीचे तपशील प्रथम दुरुस्त करून घ्यावे लागतील.

पॅनकार्डावरील तपशिलांची दुरुस्ती तुम्ही TIN-NSDL च्या वेबसाईटवर करू शकाल. आधारवरील तपशिलाच्या दुरुस्तीसाठी UIDAI ची वेबसाईट किंवा आधार केंद्रांची सेवा वापरता येऊ शकेल.